Guada Negative blood group Dainik Gomantak
ग्लोबल

New Blood Group: शास्त्रज्ञांना सापडला नवीन रक्तगट!! जगातील एकमेव महिला निघाली 'ग्वाडा निगेटिव्ह'

Guada Negative Blood: कॅरिबियन बेटावरील एका फ्रेंच महिलेमध्ये जगातील ४८ वा नवीन रक्तगट सापडला आहे

Akshata Chhatre

पॅरिस: वैद्यकीय क्षेत्रात एका महत्त्वपूर्ण आणि दुर्मिळ शोधाची नोंद झाली आहे. फ्रान्सच्या रक्तपुरवठा संस्थेने नुकतीच घोषणा केली आहे की, कॅरिबियन बेटावरील ग्वादेलोप येथील एका फ्रेंच महिलेमध्ये जगातील ४८ वा नवीन रक्तगट सापडला आहे. या अनोख्या रक्तगटाला 'ग्वाडा निगेटिव्ह' असे नाव देण्यात आले आहे. सध्या, या रक्तगटाची ज्ञात वाहक ही एकटी महिलाच आहे.

१५ वर्षांच्या संशोधनानंतर 'अनोख्या' रक्ताचा उलगडा

हा शोध तब्बल १५ वर्षांच्या संशोधनानंतर समोर आला आहे. २०११ मध्ये शस्त्रक्रियेपूर्वी नियमित तपासणी करत असताना एका रुग्णाच्या रक्ताचा नमुना संशोधकांना मिळाला होता. तेव्हाच त्यामध्ये एक 'अत्यंत असामान्य' अँटीबॉडी आढळून आली होती, अशी माहिती या शोधात सहभागी असलेले वैद्यकीय जीवशास्त्रज्ञ थियरी पेयर्ड यांनी दिली.

त्यावेळी मात्र, पुढील संशोधनासाठी पुरेसे संसाधने उपलब्ध नव्हती. अखेरीस, २०१९ मध्ये 'हाय-थ्रूपुट डीएनए सिक्वेन्सिंग' तंत्रज्ञानामुळे शास्त्रज्ञांना हे रहस्य उलगडता आले. या तंत्राने एका विशिष्ट जनुकीय उत्परिवर्तनावर प्रकाश टाकला, असे पेयर्ड म्हणाले.

जगातील एकमेव ज्ञात वाहक

हा नवीन रक्तगट जगामध्ये अधिकृतपणे 'इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन'ने जून महिन्याच्या सुरुवातीला मिलान येथे मान्यता दिली आहे. या वैज्ञानिक संस्थेने आतापर्यंत ४७ रक्तगट प्रणालींना मान्यता दिली होती, आता त्यात 'ग्वाडा निगेटिव्ह'ची भर पडली आहे.

पेयर्ड यांच्या मते, ज्या ५४ वर्षीय महिलेमध्ये हा रक्तगट सापडला, ती सध्या पॅरिसमध्ये राहत आहे. तिच्या वडिलांकडून आणि आईकडून तिला हे उत्परिवर्तित जनुक वारसाहक्काने मिळाले आहे. ही महिला "निःसंशयपणे जगातील एकमेव ज्ञात रुग्ण आहे," असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. "ती जगातील एकमेव अशी व्यक्ती आहे जी स्वतःशी सुसंगत आहे," असेही त्यांनी अधोरेखित केले. 'ग्वाडा निगेटिव्ह' हे नाव ग्वादेलोप बेटाच्या नावावरून ठेवले असून, ते "सर्व भाषांमध्ये चांगले वाटते" असे पेयर्ड यांनी सांगितले.

नवीन शोधांचे महत्त्व आणि भविष्यातील आशा

१९०० च्या दशकाच्या सुरुवातीला ABO रक्तगट प्रणालीचा शोध लागला होता. डीएनए सिक्वेन्सिंगमधील प्रगतीमुळे अलिकडच्या वर्षांत नवीन रक्तगटांचा शोध वेगाने होत आहे. आता पेयर्ड आणि त्यांचे सहकारी याच रक्तगटाचे इतर लोक शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. "नवीन रक्तगट शोधणे म्हणजे दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देणे," असे EFS ने म्हटले आहे. या शोधामुळे दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णांसाठी भविष्यात अधिक प्रभावी उपचार पद्धती विकसित करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT