Nepal Plane Crash
Nepal Plane Crash Dainik Gomantak
ग्लोबल

Nepal Plane Crash: नेपाळमधील विमान अपघाताबाबत मोठा खुलासा, 72 लोक ठार

Manish Jadhav

Nepal Plane Crash: नेपाळमधील विमान अपघाताचे कारण समोर आले आहे. विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या तपास समितीने सांगितले की, यती एअरलाइन्सच्या एटीआर-72 विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरने विमान अपघाताचे कारण शोधले आहे.

15 जानेवारी रोजी पोखरा येथे झालेल्या विमान अपघातामागे इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे संकेत असल्याचे चौकशी समितीने म्हटले आहे.

विमान ATR-72 च्या अपघातात 72 जणांचा मृत्यू झाला होता

यती एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक-691, 15 जानेवारी रोजी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर, पोखरा येथे लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी नवीन आणि जुन्या विमानतळादरम्यान वाहणाऱ्या सेती नदीत कोसळले होते.

या अपघातात ATR-72 मॉडेलच्या विमानातील 72 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये 55 नेपाळी आणि 15 परदेशी नागरिकांचा (Citizens) समावेश होता, त्यात पाच भारतीय आणि चार क्रू सदस्यही होते.

अपघातातील 6 प्रवाशांची ओळख पटू शकली नाही, डीएनए तपासणी सुरु

नेपाळच्या (Nepal) अधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये विमान अपघातात जीव गमावलेल्या सहा प्रवाशांची डीएनए चाचणी सुरु केली, ज्यांच्या अवशेषांची अद्याप ओळख पटलेली नाही.

त्रिभुवन युनिव्हर्सिटी टीचिंग हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गोपाल कुमार चौधरी म्हणाले की, "पोखरा विमान दुर्घटनेतील सहा जणांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या आवश्यक होत्या, कारण त्यांचे मृतदेह गंभीररित्या जळाले होते."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT