Nepal Janata Party Monica Verma Twitter
ग्लोबल

कमळ, भगवा रंग आणि नाव सगळंच ढापलं; सीमापार देशात 'नेपाळ जनता पार्टी' स्थापन

विशेष म्हणजेच मागील अडीच महिन्यात पक्षात 40,000 सदस्य नोंदणी झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Nepal Janata Party: भारतात 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने देशात मजबूत स्थान निर्माण केले आहे. भाजपाची देशात व्याप्ती वाढत असताना पक्षाची हुबेहूब कॉपी करत नेपाळमध्ये एका पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

विशेष म्हणजेच मागील अडीच महिन्यात पक्षात 40,000 सदस्य नोंदणी झाली आहे. तर, पक्षाने एका स्थानिक निवडणुकीत 14 जागा देखील जिंकल्या आहेत.

'नेपाळ जनता पार्टी' (Nepal Janata Party) असे या पक्षाचे नाव आहे. 2008 मध्ये या पक्षाची स्थापना करण्यात आलीय. स्थापनेपासून अलिकडे या पक्षाला मोठे यश मिळाले आहे. 'नेजपा'चे उपाध्यक्ष खेमनाथ आचर्य हे भाजपच्या जवळचे मानले जातात. राममंदिरासाठी नेपाळहून शाळीग्राम दगड आण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असल्याचे मानले जाते.

अलिकडेच झालेल्या एका निवडणुकीत अनिल कुमार अग्रवाल यांच्या उमेदवारीचा बॅनर व्हायरल झाला होता. यात बॅनरवर अनिल अग्रवाल दिसतायेत तसेच, यावर पक्षाचे चिन्ह कमळ आणि बॅनरचा रंग देखील भगवा वापरण्यात आला आहे. 'नये लोग नयी सोच' अशी पक्षाची टॅगलाईन आहे. मोनिका वर्मा यांनी याबाबत माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे.

नेपाळमध्येही हिंदुत्वाची लाट?

नेपाळमध्ये हिंदुत्ववादी राजकारणाची सुरूवात झालीय, देशातील हिंदू लोकांचा वाढता टक्का हे यामागील मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. अशात नेपाळ जनता पार्टीचे देशातील वाढते महत्व यामुळे येत्या काळात राजकारणात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

नेपाळमधील सात पक्षांना राष्ट्रीय दर्जा

नेपाळची कम्युनिस्ट पार्टी (युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) (सीपीएन-यूएमएल), नेपाळी काँग्रेस, सीपीएन (माओवादी), राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (आरएसपी), राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष, जनता समाज पक्ष आणि जनमत पक्ष या पक्षांना अलिकडे निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Temba Bavuma: 'मैदानावर जे घडलं ते मी विसरत नाही...' बुमराह-पंतने मागितली माफी; टेंबा बावुमाचा टीम इंडियाबाबत मोठा खुलासा VIDEO

बॉडी कॅमेऱ्याशिवाय 'तालांव' फाडता येणार नाही; पोलिसांच्या गणवेशावर 'तिसरा डोळा', संवाद होणार कॅमेऱ्यात कैद!

Goa Live Updates: चिंबेल ग्रामस्थ रविवारपासून करतील उपोषण

Saligao Theft: गोव्यात भरदिवसा चेन स्नॅचिंगचा थरार! सीसीटीव्हीत चोरट्याची करामत कैद; पोलिसांकडून शोध सुरु

रोषणाईने उजळले किनाऱ्यांचे गाव! गोव्यात नाताळचा जल्लोष; पाहा पणजीच्या 'इमॅक्युलेट'चर्चचा Video

SCROLL FOR NEXT