Space Station Dainik Gomantak
ग्लोबल

Space Stationला पडल्या भेगा; NASA ने व्यक्त केली भीती

ISS च्या झरीया मॉड्यूलमध्ये असा तडा गेल्याचं दिसून आलं असून, हे मॉड्युल 1998 मध्ये रशियाने लाँच केलं होतं.

दैनिक गोमन्तक

रशियन अंतराळवीरांना (Russia Cosmonauts) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (International Space Station) एका भागाला तडा (Cracks) गेल्याचं आढळून आलं आहे. ISS ला गेलेल्या या तड्यामुळे येत्या काळात धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती अंतराळवीरांनी व्यक्त केली आहे.

ISS च्या झरीया मॉड्यूलमध्ये असा तडा गेल्याचं दिसून आलं आहे. हे मॉड्युल 1998 मध्ये रशियाने लाँच केलं होतं. याबाबत अंतराळ अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, अंतराळ स्थानकात अशा प्रकारचे क्रॅक आणखी वाढू शकतात.

रॉकेट आणि स्पेस कॉर्पोरेशन एनर्जियाचे मुख्य अभियंता व्लादिमीर सोलोव्योव्ह म्हणाले की, जारया मॉड्यूलमध्ये काही ठिकाणी पृष्ठभागाला तडा गेल्याचं आढळलं आहे. भविष्यात हे क्रॅक्स मोठ्या संकटांना आमंत्रण देवू शकतात, कालांतराने स्पेसमध्ये क्रॅक होवू शकते. याचा परिणाम म्हणजे वायूगळती झाली की नाही याबद्दल मात्र त्यांनी सांगितले नाही.

गेल्या वर्षी, ISS क्रू सदस्यांनी अनेक आठवडे वायूगळतीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्यांना ज्वेज्डा नावाच्या रशियन मॉड्यूलमध्ये त्याचा शोध लागला. वायूगळतीमुळे क्रू मेंबर्सला कोणताही धोका नसल्याचं नासाने म्हटलं होतं. मात्र यामुळे आता कामात थोडा अडथळा निर्माण झाला आहे.

सोलोविओव म्हणाले की, आयएसएसची बहुतेक उपकरणे जुनी होत आहेत. त्यांनी इशारा दिला की 2025 पर्यंत तुटलेल्या उपकरणांमुळे 'एवलांच' होऊ शकते. एप्रिलमध्ये उपपंतप्रधान युरी बोरिसोव म्हणाले की, आयएसएसची सर्विस लाइफ संपत आहे.

नासाने 2018 मध्ये अमेरिकन अंतराळवीरांनी ISS वर ड्रिल केल्याचा रशियाचा दावा फेटाळल्यानंतर अंतराळ स्थानकातील क्रॅकचा शोध अशा वेळी लागला आहे. अंतराळवीरांना लवकर पृथ्वीवर पाठवता यावं यासाठी असं करण्यात आलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT