NASA Dart Mission NASA Twitter
ग्लोबल

NASA Dart Mission:'पृथ्वी संरक्षणाची मोहीम यशस्वी'; लघुग्रहावर आदळले अंतराळयान

अडथळ्याशिवाय ग्रह संरक्षण प्रणाली पूर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पृथ्वीला लघुग्रहांपासून (Asteroid) संरक्षणाची नासाने घेतलेली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. नासाने (NASA) मंगळवारी (दि.27) पृथ्वीचे लघुग्रहापासून संरक्षण करण्यासाठी एक चाचणी घेतली. पहाटे 4:44 वाजता डार्ट अंतराळयान आणि डिमॉर्फोस नावाच्या लहान लघुग्रहाची एकमेंकाशी यशस्वी टक्कर झाली. कोणत्याही अडथळ्याशिवाय ग्रह संरक्षण प्रणाली पूर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भविष्यात कोणताही लघुग्रह नष्ट करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो.

(Nasa Dart Mission Successfully Crashed into Asteroid)

नासाच्या वतीने या घटनेचे लाईव्हस्ट्रीम करण्यात आले होते. लघुग्रहावर आणि यानाची ज्यावेळी टक्कर झाली त्यावेळी नासाच्या शास्त्रज्ञांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. डार्ट मिशनचे समन्वयक लीड नॅन्सी चाबोट म्हणाले, आम्हाला माहित होते की चाचणी यशस्वी होईल. पण, अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. एवढ्या नेत्रदीपकपणे यान छोट्या लघुग्रहावर आदळणे हे मोठे यश आहे.

नासाच्या डार्ट प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा लघुग्रहावर अवकाशयान टक्करचा काही परिणाम होतो का हे तपासणे. त्याच्या दिशेवर आणि वेगावर काही परिणाम होतो की नाही हे पाहणे. अंतराळयानाच्या टक्करमुळे डिमॉर्फोसवर परिणाम झाला असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या टक्करमुळे लघुग्रहाला किंचित धक्का बसला असावा आणि मोठ्या लघुग्रहाभोवती त्याची कक्षा बदलली असावी. पृथ्वीवरील आणि अवकाशातील दुर्बिणी या बदलाचे मोजमाप करणार आहेत.

नासा लाइव्हस्ट्रीम अधिकारी बिल नेल्सन यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया नासाकडे व्यक्त केली आहे. नेल्सन म्हणाले, “ डार्ट प्रकल्पामुळे या मोहिमेद्वारे आपण आपल्या ग्रहाचे लघुग्रहांपासून संरक्षण कसे करावे हे शिकू शकतो. या मोहिमेद्वारे, आमचा हा प्रयत्न आहे की ग्रहांचे संरक्षण हा एक जागतिक गरज आहे, आणि आपल्या ग्रहाचे रक्षण करणे शक्य आहे.”

नासाच्या डार्ट मोहिमेतून लघुग्रहाच्या स्थितीत झालेल्या बदलाचा अहवाल येणे अजून बाकी आहे. येत्या काही दिवसांत शास्त्रज्ञ डिडीमॉस प्रणालीचा अभ्यास करतील. यामध्ये डिमॉर्फोसच्या कक्षेत होणारे बदल आणि अवकाश दुर्बिणीचा जमिनीवरील वेधशाळेच्या सहाय्याने अभ्यास केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT