PM Modi-Justin Trudeau Meeting Dainik Gomantak
ग्लोबल

कॅनडातील वाढत्या खलिस्तानी कारवायांवर PM मोदींनी व्यक्त केली चिंता, म्हणाले...

PM Modi-Justin Trudeau Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडात खलिस्तानच्या वाढत्या घटनांबद्दल पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडे भारताची चिंता व्यक्त केली आहे.

Manish Jadhav

PM Modi-Justin Trudeau Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडात खलिस्तानच्या वाढत्या घटनांबद्दल पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडे चिंता व्यक्त केली आहे.

रविवारी, G-20 शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि जस्टिन ट्रूडो यांच्या द्विपक्षीय चर्चेत, पंतप्रधान मोदींनी ट्रूडो यांना स्पष्टपणे सांगितले की, कॅनडामध्ये अतिरेकी फुटीरता वाढवण्यात गुंतले आहेत.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांनी ट्रुडो यांना सांगितले की, कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांविरोधात अतिरेकी हिंसाचार भडकवत आहेत.

ते भारताच्या राजनैतिक संकुलांना लक्ष्य करत आहेत. त्याचबरोबर, ते भारतीय समुदाय आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांनाही लक्ष्य करत आहेत.

पीएम मोदी ट्रुडो यांना म्हणाले...

याशिवाय, पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांना सांगितले की, संघटित गुन्हेगारी, ड्रग सिंडिकेट, मानवी तस्करी यासारख्या अतिरेकी घटकांचा संबंध कॅनडासाठी चिंतेचा विषय आहे. अशा प्रकारांना सामोरे जाण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

ट्रुडो यांनी काय उत्तर दिले?

तथापि, ट्रूडो म्हणाले की, त्यांचा देश नेहमीच शांततापूर्ण निषेधांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करेल. ट्रूडो पुढे म्हणाले की, त्यांचा देश हिंसाचार थांबवेल आणि द्वेष कमी करण्यासाठी प्रयत्न करेल. काही लोकांच्या कृती संपूर्ण समुदायाचे किंवा कॅनडाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांविरोधात हिंसाचार भडकावत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी खलिस्तानच्या नापाक कारवायांबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याकडे चिंता व्यक्त केली. कॅनडातील अतिरेकी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांविरोधात हिंसाचार भडकावत असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले.

कॅनडा हा खलिस्तानी समर्थकांचा बालेकिल्ला बनल्याबद्दल भारताने ट्रुडो यांच्याकडे आपली चिंता व्यक्त केली. बैठकीत पीएम मोदींनी ट्रुडो यांचे लक्ष भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांविरोधात हिंसाचार भडकावणाऱ्या खलिस्तानी अतिरेक्यांकडे वेधले.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी ट्रूडो यांना सांगितले की कॅनडातील अतिरेकी तत्व फुटीरतावाद वाढवत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी खलिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलण्याबाबत नुकतेच भाष्य केले होते.

ब्रिटनमध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

Goa Crime: लिफ्ट देण्याचा बहाणा अन् निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार; 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT