benet.jpg 
ग्लोबल

इस्त्रायलच्या पंतप्रधानपदी नफ्ताली बेनेट यांची वर्णी

गोमंन्तक वृत्तसेवा

इस्त्रायलच्या (Israel) पंतप्रधानपदी (Prime Minister) सलग 12 वर्षे राहिलेले बेंजामिन नेत्यान्याहू (Benjamin Netanyahu) यांना अखेर सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले. इस्त्रायलच्या संसदेने रविवारी यामिना पक्षाचे (Yamina party) प्रमाख नफ्ताली बेनेट (Naphtali Bennett) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कौल दिला आहे. 

डावे, उजवे आणि मध्यमवर्गीय पक्ष तसेच अरब पक्ष अशा वैचारिकदृष्ट्या भिन्न राजकीय पक्षांची अभूतपूर्व आघाडी असलेल्या या नव्या सरकारकडे अगदी निसटते बहुमत आहे.

60 विरुध्द 59 केवळ एका मताने नव्या आघाडीने विजय मिळवला आहे. इस्त्रायली संसदेमध्ये बेनेट यांनी रविवारी त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांचा परिचय करुन दिला आहे. बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या समर्थकांनी त्यांच्या भाषणामध्ये वारंवार अडथळे आणले होते. विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या गोंधळात नवनिर्वाचित पंतप्रधान बेनेट यांनी भाषणामध्ये नव्या आघाडीच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. वेगवेगळ्या मतांच्या नेत्यांसोबत आपण आघाडी तयार केली असून, या आघाडीबाबत आपल्याला अभिमान आहे. या निर्णायक क्षणी आम्ही योग्य ती जबाबदारी घेतली आहे. या देशाला पुन्हा एकदा विभाजित होऊ द्यायचे नाही, यासाठी असा निर्णय घ्यावा लागला, असे बेनेट यावेळी म्हणाले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT