Mysterious Object on Australian Beach. Dainik Gomantak
ग्लोबल

Watch Video: ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर रहस्यमय वस्तू; भारताच्या रॉकेटचे अवशेष असल्याच्या चर्चा

Ashutosh Masgaunde

Mysterious Object Washed up on Australian Beach: ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर एक रहस्यमय वस्तू वाहून आली आहे. यानंतर काहींनी ही रहस्यमय वस्तू भारतीय रॉकेटचा अवशेष असल्याची चर्चा सुरू केली आहे.

रॉकेटचा एक भाग, बार्नॅकल, जुलैच्या मध्यात ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या ज्युरियन खाडीजवळ प्रथम दिसला होता, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

फोटोसाठी लोकांच्या उड्या

ही बातमी समोर आल्यानंतर लोकांनी फोटो काढायला मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याठीकाणी पोहोचून परिसराची नाकेबंदी केली.

हा अवशेष सापडल्यानंतर शास्त्रज्ञांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. काहींचे म्हणणे आहे की ही वस्तू लष्कराची असू शकते, तर काहींनी याचा संबंध बेपत्ता मलेशियन एअरलाइन्सचे फ्लाइट MH370 शी जोडला आहे.

स्पेस एजन्सीचा दावा

ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने असा निष्कर्ष काढला आहे की ही वस्तू पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) च्या तिसऱ्या टप्प्यातील अवशेष आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल प्रक्षेपण वाहन चालवते. ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने सांगितले की, दोन्ही देशांचे अधिकारी याची पुष्टी करण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

भली मोठी वस्तू

ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेल्या वस्तूची उंची सुमारे 2 मीटर म्हणजे 6.6 फूट आहे. त्यावरून केबल्स लटकत आहेत.

ऑस्ट्रेलियात अवकाशातील अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑगस्टमध्ये, न्यू साउथ वेल्समधील एका शेतकऱ्याला एलोन मस्कच्या स्पेसएक्स मिशनचा अवशेष सापडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT