Earthquake in Ladakh Dainik Gomantak
ग्लोबल

Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रता

भूकंपाचे हे धक्के बर्मा, म्यानमारमध्ये पहाटे 3:52 वाजता जाणवले

दैनिक गोमन्तक

Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी मोजली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू बर्मापासून 162 किमी अंतरावर होता.या भूकंपाची खोली पृथ्वीच्या 140 किमी खाली होती. आत्तापर्यंत यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे हे धक्के म्यानमारमधील बर्मात (Burma) पहाटे 3.52 वाजता जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

* म्यानमारमधील भूकंपामुळे लोक हैराण झाले आहेत

म्यानमारमध्ये शुक्रवारी जोरदार भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोक चिंतेत आले आहेत.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची (Earthquake) खोली जमिनीखाली 140 किमी होती. म्यानमारमधील भूकंपानंतर मणिपूर, नागालँड आणि दक्षिण आसामसह ईशान्य भारतातील (India) काही भागातही हे धक्के जाणवले. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

इंडोनेशियामध्ये 24 सप्टेंबरला भूकंप झाला

यापूर्वी 24 सप्टेंबर रोजी इंडोनेशियाच्या उत्तरेकडील एकेह प्रांतात भूकंपाच्या धक्क्याने पृथ्वी हादरली होती. यादरम्यान भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मात्र, यादरम्यानही कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. 24 सप्टेंबर रोजी अंदमान निकोबारमध्येही (Andaman and Nicobar) भूकंपाचे धक्के जाणवले. यादरम्यान भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आली होती. हा भूकंप 24 सप्टेंबर रोजी म्हणजेच शनिवारी दुपारी 2.30 वाजता आला होता. यापूर्वी 5 जुलै रोजीही या भागात 5.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT