Ramazan 2023: जगभरात पवित्र रमजान महिना सुरु झाला आहे. पण चीनमधील मुस्लिमांची स्थिती वाईट आहे. चीनमधील मुस्लिमांना रोजा न ठेवण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. चीनमधील मुस्लिमांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे.
आरएफएच्या अहवालानुसार, शिनजियांगच्या वायव्य भागातील मुस्लिमांना (Muslims) आणि त्यांच्या मुलांना रोजा करु न देण्याचे आदेश दिले जात आहेत. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांनी त्यांचे पालक रोजा करत आहेत का, याचीही चौकशी केली.
आरएफएच्या अहवालानुसार, वर्ल्ड उइघुर काँग्रेसचे प्रवक्ते दिलशत ऋषित यांनी सांगितले की, रमजानच्या काळात प्रशासनाने शिनजियांगमधील 1,811 गावांमध्ये 24 तास देखरेख करणारी यंत्रणा लागू केली आहे.
अहावालानुसार, चीनमधील 11.4 दशलक्ष हुई मुस्लिमांचा वांशिक चीनी समुदायाबरोबर अमीट बंध निर्माण झाला आहे. त्यांनी आपली मुस्लिम श्रद्धा शतकानुशतके जपली आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या कठोर धार्मिक नियमांनुसार त्यांचा पूर्णपणे नाश होण्याचा धोका आहे.
RFA अहवालानुसार, नेटवर्क ऑफ चायनीज ह्युमन राइट्स डिफेंडर्स (CHRD) सह अधिकार गटांच्या युतीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, चीन (China) त्यांना धोका मानतो आणि बळाच्या मदतीने त्यांना दडपून टाकू इच्छितो.
RFA च्या अहवालानुसार, चीनने आपल्या वांशिक एकीकरण मोहिमेद्वारे मुस्लिम समुदायांना देखील लक्ष्य केले आहे, ज्या अंतर्गत अधिकारी वांशिक अल्पसंख्याक उईघुर कुटुंबातील सदस्यांना दारु पिणे आणि डुकराचे मांस खाण्यासह गैर-मुस्लिम प्रथा पाळण्यासाठी दबाव आणतात.
RFA अहवालानुसार, किमान 1.8 दशलक्ष उईघुर आणि इतर वांशिक अल्पसंख्याक मुस्लिमांना शिनजियांगमधील पुनर्शिक्षण शिबिरांमध्ये मोठ्या प्रमाणात कैद करण्यात आले आहे.
याशिवाय, शिबिरांमध्ये उईघुर महिलांचे बलात्कार, लैंगिक शोषण आणि सक्तीने नसबंदी, त्यांच्या सक्तीच्या मजुरीत सहभागासह एकीकरण धोरणे लागू करण्यात आली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.