Muslim Love Jesus Dainik Gomantak
ग्लोबल

Muslim Love Jesus: 'मुस्लिम लव्ह जीझस'चे अमेरिकेत लागले होर्डिंग्ज, लोकांनी अशा दिल्या प्रतिक्रिया

Islam-Christianity Similarity: अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये काही खास होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत, ज्याबद्दल लोक आता प्रश्न विचारत आहेत.

दैनिक गोमन्तक

Islam-Christianity Similarity: अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये काही खास होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत, ज्याबद्दल लोक आता प्रश्न विचारत आहेत.

खरे तर अमेरिकेतील टेक्साससह अनेक शहरांमध्ये रस्त्यांच्या कडेला ख्रिश्चन आणि इस्लाममधील समानतेचे संदेश देणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

दरम्यान, असेच एक होर्डिंग ह्युस्टनमधील एका वर्दळीच्या महामार्गावरही (Highway) पाहायला मिळाले आहे. जे तेथून जाणाऱ्या हजारो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

वास्तविक, या फलकावर 'मुस्लिम्स लव्ह जीझस' असे लिहिले आहे. याचा अर्थ मुसलमान येशूवर प्रेम करतात. या संदेशाच्या खाली 'एकाच देवाचा संदेश आणि त्याचे पैगंबर' असेही लिहिले आहे. आता या होर्डिंग्सबाबत लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

'मेरी' होर्डिंगमध्ये हिजाब परिधान करुन दिसली

इलिनॉयमधील इस्लामिक एज्युकेशन सेंटर 'गेनपीस' धर्मा-धर्मामधील समानता दर्शविण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी डॅलस, शिकागो आणि मध्य न्यू जर्सीसह देशभरात असे होर्डिंग्ज लावत आहे. येथे एका होर्डिंगमध्ये मेरी हिजाब परिधान केलेली दिसतेय. या होर्डिंगवर 'लकी मेरीने हिजाब घातला' असे लिहिले आहे. तुम्ही त्याचा आदर कराल का?'

त्याचप्रमाणे, दुसऱ्या एका होर्डिंगमध्ये मुस्लिमांचे पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या काबाच्या इमारतीचे चित्र असून 'इब्राहिमने बांधलेली, एका देवाच्या उपासनेला समर्पित, लाखो मुस्लिमांचे (Muslim) तीर्थक्षेत्र' असा संदेश लिहिला आहे.

एनजीओने हा युक्तिवाद केला

'गेनपीस' ही एक एनजीओ आहे, ज्याचा उद्देश सर्वसामान्यांना इस्लामची माहिती देणे हा आहे. ते इस्लामबद्दलच्या शंका आणि गैरसमज दूर करते. हे होर्डिंग बहुतेक शहरांमध्ये लावले जातात, जिथे त्यांची एनजीओ मजबूत स्थितीत आहे आणि मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याबाबत महत्वाची बातमी! जागतिक घडामोडींचा थेट परिणाम; काय आहेत आजचे दर? जाणून घ्या..

गोव्यातील धोकादायक धबधब्यापाशी 29 जणांवर कारवाई, कर्नाटकच्या पर्यटकांनी तोडला नियम; वनविभागाने दाखवला खाक्या

गोव्यासाठी आनंदाची बातमी! 'हा' खेळाडू खेळणार भारतीय संघाकडून क्रिकेट; थायलंडला होणार रवाना

Viral Video: ..हेच खरे गोमंतकीय! 75 वर्षांचे आजोबा बघताबघता चढताहेत झाडावर; गोव्याचे 'बाप्पा' होताहेत सोशल मीडियावर हिट

Goa Food Poisoning: बागा समुद्रकिनाऱ्यावर इडली-सांभार खाणं बेतलं जिवावर! केरळच्या 16 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

SCROLL FOR NEXT