Muslim Countries Will Compromise With Israel On America Initiative Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेच्या पुढाकाराने मुस्लिम देश इस्रायलशी तडजोड करणार! सौदीने 4 अरब देशांची बोलावली बैठक

Muslim Countries: एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबायचं नाव घेत नाहीये, दुसरीकडे, अमेरिकेच्या पुढाकाराने मुस्लिम देश इस्रायलशी तडजोड करण्यास तयार होताना दिसत आहेत.

Manish Jadhav

Muslim Countries Will Compromise With Israel On America Initiative:

एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबायचं नाव घेत नाहीये, दुसरीकडे, अमेरिकेच्या पुढाकाराने मुस्लिम देश इस्रायलशी तडजोड करण्यास तयार होताना दिसत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्या भेटीनंतर सौदी अरेबियाने गाझावरील चर्चेसाठी अरब राजनैतिक अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.

अहवालानुसार, या चर्चेदरम्यान मध्यपूर्वेतील चार प्रमुख राजनयिकांनी पॅलेस्टाईनची मान्यता कायम ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे पुन्हा सांगितले. ब्लिंकन यांच्या मध्यपूर्व दौऱ्यानंतर गुरुवारी ही बैठक झाली. गाझामध्ये युद्ध सुरु झाल्यापासून मध्यपूर्वेतील त्यांची ही 5वी भेट होती. या बैठकीला इजिप्त, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते. पॅलेस्टिनीचा एक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होता.

दरम्यान, मुस्लिम देशांच्या बैठकीत मंत्र्यांनी गाझा पट्टीतील युद्ध संपवण्यावर ताबडतोब युद्धविराम लागू करणे, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांतर्गत नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करणे आणि मानवतावादी मदतीस अडथळा आणणारे निर्बंध उठवणे यावर भर दिला. गाझावरील बॉम्बहल्ल्यांवर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढील आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेते गाझामधील सद्यस्थिती आणि संकटावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या प्रयत्नांवर चर्चा करतील.

गाझामधील हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला

इस्रायलच्या हल्ल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, युद्धविरामासाठी इस्रायल आणि हमास यांच्यावर सतत दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, गाझामध्ये होत असलेल्या कारवाया अत्यंत टोकाच्या आहेत, असा माझा विश्वास आहे.'

दुसरीकडे, गाझामधील निम्म्याहून अधिक लोक इजिप्तच्या सीमेला लागून असलेल्या रफाह शहरात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, इजिप्तची बरीचशी सीमा प्रतिबंधित आहे आणि मानवतावादी मदतीसाठी हा मुख्य प्रवेश बिंदू आहे. इजिप्तने चेतावणी दिली आहे की, येथे कोणतीही जमीनी कारवाई किंवा सीमा ओलांडून मोठ्या प्रमाणात विस्थापन झाल्यास इस्रायलसोबतचा 40 वर्षांचा शांतता करार मोडला जाईल.

आतापर्यंत 27 हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे

कुवैती रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमध्ये दोन महिला आणि पाच मुलांसह किमान 13 लोक ठार झाले आहेत. चार महिन्यांत इस्रायलच्या हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांमध्ये 27,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. इस्रायली हल्ल्यांमुळे बहुतेक लोकांना घरे सोडावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT