Music festival Dainik Gomantak
ग्लोबल

इस्रायलमध्ये हमासचा हैदोस! संगीत महोत्सवात 260 जण ठार, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरुच आहे. यातच, नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये हमासच्या हल्ल्यात सुमारे 260 लोक मारले गेले.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरुच आहे. यातच, नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये हमासच्या हल्ल्यात सुमारे 260 लोक मारले गेले. रविवारी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या संगीत महोत्सवात सुमारे 3,000 लोक सहभागी झाले होते, यामध्ये इस्रायली तरुणांची संख्या मोठ्याप्रमाणात होती. इस्रायली बचाव सेवा झाकाने सांगितले की, पॅरामेडिक्सनी संगीत महोत्सवातून सुमारे 260 मृतदेह काढले आहेत. X वर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भयानक दृश्ये पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये संगीत महोत्सवाच्या ठिकाणांवरुन क्षेपणास्त्र उडताना दिसत आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी (Terrorists) इस्रायली प्रदेशात घुसखोरी केली. दहशतवाद्यांनी महोत्सवात सामील झालेल्या लोकांना घेरले आणि गोळीबार केला.

द टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, महोत्सवात सहभागी झालेल्या लोकांना मारुन हमासचे दहशतवादी निघून गेले. दुसरीकडे, एका वापरकर्त्याने X वर व्हिडिओ शेअर करताना लिहिले, "इस्रायलमधील संगीत महोत्सवाच्या दिशेने क्षेपणास्त्रे येताना दिसली, जेव्हा हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली प्रदेशावर हल्ला केला."

दुसर्‍या व्हिडिओमध्ये, 25 वर्षीय इस्रायली महिला नोआ अर्गामानी हिला हमासच्या दहशतवाद्याने मोटारसायकलवरुन पळवून नेले. ती आपल्या जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडे गयावया करताना दिसली. "मला मारु नका! नाही, नाही, नाही" असं म्हणताना ती व्हिडिओमध्ये दिसत आहे.

विशेष म्हणजे, व्हिडिओमध्ये तिचा प्रियकरही दिसत आहे, जो अर्गामानीला दहशतवाद्यांकडून पकडले जात असताना असहाय्यपणे पाहत आहे.

तसेच अजून एका व्हिडिओमध्ये, हमासच्या एका पिकअपमध्ये जर्मन टॅटू आर्टिस्ट शनी लुक नग्नवस्थेत दिसत आहे. हमासचा (Hamas) एक दहशतवादी तिच्या अंगावर थुंकला. तिची बहीण अदि लुक हिने व्हिडिओमध्ये शनि असल्याची पुष्टी केली, तर तिच्या आईने तिच्या ठावठिकाणाबद्दल अधिक माहितीसाठी लोकांना आवाहन केले.

दुसरीकडे, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे आतापर्यंत 1,100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर गाझामध्ये आतापर्यंत 413 लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने आतापर्यंत 100 जणांना ओलीस ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

SCROLL FOR NEXT