Mozambique Boat Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Mozambique Boat Accident: मोझांबिकमध्ये मोठा अपघात, बोट उलटल्याने 90 हून अधिक लोकांचा मृत्यू; बुडालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश!

Mozambique Boat Accident: मोझांबिकच्या उत्तर किनाऱ्यावर रविवारी एका बोटीला अपघात झाला. बोट उलटल्याने मुलांसह 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Mozambique Boat Accident: मोझांबिकच्या उत्तर किनाऱ्यावर रविवारी एका बोटीचा अपघात झाला. बोट उलटल्याने मुलांसह 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. स्थानिक ऑनलाइन प्रसारक टीव्ही डायरिओ नामपुलाने सांगितले की, या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. बोटीमध्ये 130 लोक होते आणि बुडालेल्यांमध्ये अनेक मुले होती. ही बोट देशाच्या उत्तरेकडील नामपुला प्रांतातील लुंगा येथून मोझांबिक बेटाकडे जात असताना हा अपघात झाला. अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

मासेमारीसाठी बोटीचा वापर केला जात होता

दरम्यान, काही जण जत्रेत सहभागी होण्यासाठी बोटीतून निघाले होते, तर काहीजण कॉलराचा संसर्ग टाळण्यासाठी लुंगा ते मोझांबिक बेटाकडे जाण्यासाठी निघाले होते, असे टीव्ही डायरिओ नामपुलाने वृत्त दिले आहे. नामपुला प्रांताचे राज्य सचिव जेम नेटोच्या हवाल्याने म्हटले आहे की, कथित कॉलराच्या संसर्गाबद्दल चुकीच्या माहितीचा प्रसार केला गेला. यामुळे लोक घाबरले आणि संसर्गाची लागण टाळण्यासाठी मोझांबिक बेटाकडे निघाले होते. अपघात झालेली बोट साधारणपणे मासेमारीसाठी वापरली जायची.

रस्त्याचे खराब नेटवर्क

मोझांबिक आणि त्याच्या शेजारील दक्षिण आफ्रिकन देश झिम्बाब्वे आणि मलावी हे अलीकडच्या काही महिन्यांत कॉलराच्या उद्रेकाने प्रभावित झाले आहेत. मोझांबिकमधील अनेक ठिकाणी फक्त बोटींनीच पोहोचता येते. या बोटी अनेकदा त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक घेऊन जातात, ज्यामुळे अपघात होतात. परिस्थिती अशी आहे की, देशातील रस्त्यांचे नेटवर्क खराब आहे आणि काही भागात जमीन किंवा हवाई मार्गानेही पोहोचता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

SCROLL FOR NEXT