India China Border Dainik Gomantak
ग्लोबल

India China Border: सीमेवर ड्रॅगनच्या हालचालीत पुन्हा वाढ

China on LAC: चीनकडून तिबेटीय प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) वेगानं बांधकाम सुरुच आहेत.

दैनिक गोमन्तक

चीनच्या कुरापती काही थांबण्याचं नाव घेत नाही. चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) हालचाली सुरुच आहेत. चीनने एलएसीजवळ गाव वसवल्याची माहिती लष्कराने दिली आहे. भारतीय लष्कराने सोमवारी माहिती दिली, चीन अरुणाचल प्रदेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. चीनने इथं गावे देखील वसवली आहेत. भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज आहे. चीनच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जात असल्याचं लष्कराने सांगितलं आहे. (India China Border latest News)

लेफ्टनंट जनरल आरपी कलिता यांनी माहिती दिली, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) अरुणाचल प्रदेशाजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर पायाभूत सुविधा वाढवत आहेत. सीमेवर कोणत्याही संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे.

जनरल कलिता यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं, चीन (China) तिबेट प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) वेगानं बांधकाम करत आहे. चीननं इथे रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्ग विकसित केले आहेत. चीनने LAC च्या बाजूने सीमाजवळील भागामध्य गावे विकसित केली आहेत. यांचा उपयोग चीन आपली उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी करु शकतो.

चीन अरुणाचल प्रदेशाच्या सीमेजवळील भागामध्ये रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्ग तसेच 5G मोबाइल नेटवर्क सतत अपग्रेड करत आहे. चीनला याचा उपयोग त्यांच्या सैन्याला प्रतिसाद देण्यासाठी किंवा हलवण्यास होईल. भारतीय लष्कर सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य ती पाऊल उचलण्यासाठी सज्ज असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT