Jump Rope 3,000 Times Per Day
Jump Rope 3,000 Times Per Day Dainik Gomantak
ग्लोबल

आईच्या क्रूरतेचा कळस, मुलीची उंची वाढवण्यासाठी मारायला लावल्या 3,000 उड्या

दैनिक गोमन्तक

चीन (China) मधील लोकांची उंची खुप कमी असते. तेव्हा उंची वाढविण्यासाठी (Exercise to grow taller) नवनविन प्रयोग केले जातात. असाच एक प्रयोग झेंझियांग (Zhejiang Province) शहरातील एका आईने आपल्या मुलीसाठी केला आहे. आपल्या मुलीची उंची वाढवायचीच असा तिने निश्चयच केला. त्या मुलीकडून आईने एवढी एक्सरसाइज़ करून घेतली की आता त्या मुलीचे गुडघे त्रास द्यायला लागले आहे. त्या मुलीला गुडघेदुखीचा अती जास्त प्रमाणात त्रास व्हायला लागला आहे. कारण तीच्या आईने दरदिवसाला 3,000 वेळा तिला दोरीवरून उड्या मारायला (Jump Rope 3,000 Times Per Day) लावल्या.

हैंगझोउ (Hangzhou) येथील 13 वर्षीय मुलीला तिच्या आईने गुडघे निकामी होईपर्यंत दोरीवर उड्या मारण्यास भाग पाडले. मुलीने तिच्या आईकडे अनेक वेळा तक्रार केली होती की तिचे सांधे दुखत आहेत, पण आईला तिची उंची वाढवण्याचे वेड लागले होते. आणि मुलीच्या दुखण्याकडे तिने दुर्लक्ष केले.

आई दररोज 3000 स्किपिंग करायला लावायची

चिनी मीडियाच्या रिपोर्टनुसार, तिची आई 13 वर्षांच्या मुलीला दररोज 3000 वेळा दोरीवर उड्या मारायला सांगायची, जेणेकरून तिची उंची वाढेल. दरम्यान, मुलीने गुडघेदुखीची तक्रार आईकडे केली, परंतु आईने मुलीच्या या दुखण्याकडे दुर्लक्ष केले. आपली मुलगी कारणे देत आहे असे तिला वाटले. आणि तिच्या व्यायामाचे वेळापत्रक रोज चालू ठेवले. युआनयुआन नावाच्या या मुलीची उंची 1.58 मीटर होती आणि तिचे वजन सुमारे 120 किलोग्राम होते. अशा परिस्थितीत आई तिचे वाढलेले वजन कमी करण्याचा आणि रोज व्यायाम करून तिची उंची वाढवण्याचा प्रयत्न करत होती. यासाठी आईने कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेतला नव्हता, जे ऐकले त्यावर विश्वास ठेवून मुलीच्या व्यायामाचे वेळापत्रक बनवले. पूर्वी ती मुलीला 1000 वेळा दोरीवर उड्या मारायला सांगायची, पण जसे जसे तिला वाटले की, उंची वाढण्यासाठी जास्त वेळ जात आहे तसे तिने मुलीचे वेळापत्रक बदलले. आणि तिला रोज 3000 उड्या मारायला सांगितल्या.

लगातार 3 महिने मुलीने आईचा हा अत्याचार सहन केला. यानंतर, युआनयुआनने आपल्या आईला गुडघेदुखीबद्दल सांगितले. आईने तिला डॉक्टरांकडे नेले तेव्हा त्याने सांगितले की मुलीला ट्रॅक्शन अपोफिसायटीस (traction apophysitis )झाला आहे. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की जास्त व्यायाम मुलांसाठी हानिकारक असू शकतो. जास्त व्यायाम केल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चीनमध्ये यापूर्वीही 10 वर्षांच्या मुलाला अशीच समस्या उद्भवली होती, ज्याने गुडघ्यांमध्ये वेदना झाल्याची तक्रार केली होती. डॉक्टर स्पष्टपणे सांगतात की मुलांच्या व्यायामाबरोबरच त्यांची झोप, पोषक जेवण, मनःस्थिती आणि आनुवंशिकतेची काळजी घेणे देखील आवश्यक असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

SCROLL FOR NEXT