Mata Hari Dainik Gomantak
ग्लोबल

Most Dangerous Female Spy: सर्वात खतरनाक महिला गुप्तहेर! जिच्यावर 50 हजार जवानांच्या हत्येचा होता आरोप; जाणून घ्या

Mata Hari: दोन देशांमधले युद्ध केवळ लष्करच लढत नाही, तर दुसरे युद्ध लढले जाते ज्याबद्दल सर्वसामान्यांना काहीच माहिती नसते.

Manish Jadhav

Most Dangerous Female Spy: दोन देशांमधले युद्ध केवळ लष्करच लढत नाही, तर दुसऱ्या आघाडीवर युद्ध लढले जाते ज्याबद्दल सर्वसामान्यांना काहीच माहिती नसते. हे युद्ध खरेतर हेरगिरीच्या क्षेत्रात लढले जाते.

गुप्तचर माहिती हे या युद्धातील सर्वात मोठे शस्त्र आहे. हेरगिरीच्या जगात अशी काही नावे आहेत, ज्यांनी आश्चर्यकारक पराक्रम केले आहेत. म्हणूनच या यादीत पुरुष हेरांसह महिला हेरांचीही नावे समाविष्ट आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला गुप्तहेरबद्दल सांगणार आहोत, जिला संपूर्ण जग 'माता हरी' (Mata Hari) या नावाने ओळखते. न्यूड डान्सिंग लोकप्रिय करण्याचे श्रेय देखील माता हरी यांना दिले जाते.

नेदरलँडमध्ये जन्म झाला

माता हरी यांचे खरे नाव मार्गरेटा गीर्टरुइडा ज़ेले होते. त्यांचा जन्म नेदरलँड्समध्ये (Netherlands) 1876 मध्ये झाला होता. त्यांचे लग्न एका डच लष्करी अधिकाऱ्याशी झाले होते, पण हे नाते 1902 मध्ये संपुष्टात आले.

यानंतर माता हरी यांनी स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नृत्याने त्यांची स्वप्ने पूर्ण होऊ लागली. विशेष म्हणजे, युरोपमधील सर्वात प्रसिद्ध नर्तकांपैकी त्या एक होत्या.

पहिल्या महायुद्धात...

पहिल्या महायुद्धात फ्रेंच गुप्तचर यंत्रणांची नजर माता हरी यांच्यावर पडली होती. पैशाच्या मोबदल्यात जर्मन अधिकार्‍यांकडून महत्वाची माहिती मिळवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

मात्र, त्या डबल एजंट बनल्या आणि जर्मनीसाठीही (Germany) हेरगिरी करु लागल्या. त्यांच्या नृत्यामुळे त्यांना अधिकाऱ्यांकडून संवदेनशील माहिती मिळवण्यात मदत झाली.

लवकरच दोन्ही देशांच्या हेरगिरीचे रहस्य उघड झाले

दोन्ही देशांसाठी माता हरी यांचे हेरगिरीचे रहस्य फार काळ लपून राहिले नाही. एके दिवशी दोन्ही देशांना त्या डबल एजंट असल्याची माहिती मिळाली.

फ्रेंच गुप्तचर संस्थेने त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करुन त्यांना अटक केली आणि त्यांच्यामुळे पन्नास हजार फ्रेंच सैनिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. माता हरी यांनी संवेदनशील माहिती लीक केल्यामुळे जर्मनीने फ्रान्सवर केलेल्या हल्ल्यात हे सैनिक मरण पावल्याचे बोलले जाते.

दुसरीकडे, माता हरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले पण ते पुरेसे नव्हते. देशाशी गद्दारी केल्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा झाली.

वयाच्या 41 व्या वर्षी ऑक्टोबर 1917 मध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माता हरी यांचा मृतदेह घ्यायलाही कोणी आले नाही. त्यामुळेच त्यांचा मृतदेह पॅरिसच्या मेडिकल स्कूलमध्ये प्रयोगासाठी पाठवण्यात आला. त्यांचा चेहरा अॅनाटॉमी म्युझियममध्ये ठेवण्यात आला होता, पण 26 वर्षांपूर्वी तो तिथून गायब झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT