Moscow Concert Hall Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Moscow Concert Hall Attack: मॉस्को सिटी हॉल हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई, 11 जणांना अटक; मृतांचा आकडा 93 वर पोहोचला

Manish Jadhav

Moscow Concert Hall Attack:

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एका कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या 93 वर पोहोचली आहे. जखमींची संख्या 187 असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी कार्यक्रमस्थळाला आग लावली. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने ISIS-K (ISIL) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

दुसरीकडे, रशियाच्या तपास यंत्रणांनी या प्रकरणात तत्परता दाखवत 11 जणांना अटक केली आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसच्या प्रमुखाने शनिवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना याबाबत माहिती दिली. रशियाची सरकारी न्यूज एजन्सी टासच्या हवाल्याने ही अपडेट समोर आली आहे.

दरम्यान, मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी रशियाच्या इतिहासातील सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या क्रेमलिनने सांगितले की, हल्लेखोरांनी क्रोकस सिटी हॉलवर हल्ला केल्यानंतर काही मिनिटांत पुतिन यांना याची माहिती देण्यात आली. हॉल हे मॉस्कोच्या (Moscow) पश्चिमेकडील असलेले एक मोठे संगीत ठिकाण आहे, ज्यामध्ये 6,200 लोक बसू शकतात. प्रसिद्ध रशियन रॉक बँड पिकनिकच्या मैफिलीसाठी क्रोकस सिटी हॉलमध्ये लोकांची गर्दी जमली होती तेव्हा हा हल्ला झाला. अहवालात म्हटले आहे की, हल्लेखोरांनी स्फोटके फेकल्यानंतर आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा

शुक्रवारी क्रोकस शहरात झालेल्या दहशतवादी (Terrorist) हल्ल्यानंतर रशियाच्या संस्कृती मंत्रालयाने शनिवारी मोठा निर्णय घेतला. मंत्रालयाने येत्या काही दिवसांत फेडरल सांस्कृतिक संस्थांमधील सर्व सामूहिक आणि मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली. मंत्रालयाकडून शनिवारी ही माहिती देण्यात आली. फेडरल सांस्कृतिक संस्थांमधील सामूहिक आणि मनोरंजन कार्यक्रम येत्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत. मंत्रालयाने क्रोकस सिटी हॉलमध्ये मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती शोक व्यक्त केला. ऑक्टोबर 2015 मध्ये इस्लामिक स्टेटने सिनाईमध्ये रशियन प्रवासी विमानाला लक्ष्य केले होते, ज्यामध्ये

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT