Condom Mountain Dainik Gomantak
ग्लोबल

Video! Condom Mountain: कंडोमचा डोंगर अन् मॉडेलचा रॅम्प वॉक, असे वेधले कंपनीने लक्ष

Milan Fashion Week 2023-24 अतिशय अनोख्या पद्धतीने सुरु झाला, ज्याने लोकांना चकित केले.

Manish Jadhav

Milan Fashion Week 2023-24 अतिशय अनोख्या पद्धतीने सुरु झाला, ज्याने लोकांना चकित केले. त्या सेटवर एक डोंगर बनवण्यात आला ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या फॅशन वीकमध्ये सेटवर बनवलेला डोंगर कंडोमचा होता.

दरम्यान, बुधवारी सुरु झालेल्या वॉक शो दरम्यान मॉडेल्स कंडोमच्या एका विशाल डोंगराभोवती फिरत होत्या. प्रसिद्ध कपड्यांचा (Clothes) ब्रँड डिझेल नवीन कलेक्शन घेऊन आला आहे, त्याच्या लॉन्चची थीम होती स्वातंत्र्य, आनंद आणि प्रयोग (Freedom, Pleasure, And Experimentation). कंपनीच्या नवीन कलेक्शनने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

कंडोमचा डोंगर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला

बरं, कंडोमचा डोंगर या फॅशन वीकमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू होता, ज्याने प्रेक्षकांमध्ये एकाच वेळी आश्चर्य आणि कुतूहल दोन्ही निर्माण केले होते. कंपनीला या कंडोम स्टॅकच्या मदतीने जगभरात सुरक्षित लैंगिक संदेशाचा प्रचार करायचा आहे.

यासाठी, डिझेलने ड्युरेक्ससोबत सहकार्य केले. कपडे निर्माता कंपनी डिझेल एप्रिलमध्ये जगभरात सुमारे 3 लाख कंडोम देण्याची योजना आखत आहे. त्याची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. कंपनीने सांगितले की, या फॅशन वीकमध्ये माउंटन बनवण्यासाठी 2 लाख कंडोम वापरण्यात आले.

कंपनी 3 लाख कंडोम वितरित करणार आहे

कंपनीने (Company) पुढे सांगितले की, आम्ही लोकांना 3 लाख ड्युरेक्स कंडोम देणार आहोत, जो डिझेल आणि ड्युरेक्सचा संयुक्त प्रयत्न असेल. डिझेलने कंडोमच्या डोंगराशी संबंधित फोटोही शेअर केले आहेत. डिझेलच्या या अनोख्या स्टाइलची सर्वत्र चर्चा होत आहे. एप्रिल महिन्यापासून तुम्हाला आमच्या स्टोअरमध्ये मोफत कंडोम दिले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याप्रकरणी; न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT