Microplastics Found in Mother's Milk Dainik Gomantak
ग्लोबल

Microplastics in Milk : धक्कादायक! आईच्या दुधात मिळाले मायक्रोप्लॅस्टिक; जाणून घ्या नवजात बाळाच्या आईने काय करावे

Microplastics Found in Mother's Milk : मानवी दुधात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले आहेत. म्हणजेच आईच्या दुधातून मायक्रोप्लास्टिक मुलांच्या शरीरात जात आहे.

दैनिक गोमन्तक

Microplastics Found in Mother's Milk : या पृथ्वीतलावर बाळासाठी आईचे दूध सर्वोत्तम मानले जाते, मात्र नुकतीच एक अतिशय आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. वास्तविक, अभ्यासात असे म्हटले आहे की मानवी दुधात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले आहेत. म्हणजेच आईच्या दुधातून मायक्रोप्लास्टिक मुलांच्या शरीरात जात आहे.

मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पॉलिमर्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालात असे म्हटले आहे की मानवी दुधामध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहेत जे पॉलिथिलीन, पीव्हीसी आणि पॉलीप्रॉपिलीन सारख्या घातक रसायनांपासून बनवले जातात.

(Microplastics Found in Mother's Milk)

संशोधकांनी रोम, इटलीमध्ये एका आठवड्यापूर्वी जन्म दिलेल्या 34 निरोगी मातांच्या दुधाचे नमुने घेतले आणि त्याचे सूक्ष्म विश्लेषण केले. या विश्लेषणात 75 टक्के दुधात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले.

याआधीच्या अभ्यासात मायक्रोप्लास्टिक्सचा मानवी पेशी, सागरी जीव आणि प्राण्यांवर होणारा परिणाम अधोरेखित करण्यात आला होता. प्लास्टिकमध्ये अनेकदा phthalates सारखी घातक रसायने असतात. जे आधीच मानवी आईच्या दुधात सापडले आहेत.

हे टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी काय करावे ?

या विषयाबाबतीत युनिव्हर्सिटी पॉलिटेसिनिया डेले मार्चेच्या प्राध्यापिका डॉ. व्हॅलेंटीना नोटारस्टेफानो म्हणाल्या की, आमचा अभ्यास फारच लहान असला आणि महिलांना प्लास्टिकच्या संपर्कात येण्याशी थेट संबंध नसला तरी, यापूर्वीच्या अनेक अभ्यासांनी हे दाखवून दिले आहे की प्लास्टिकमुळे मानवाचे किती नुकसान होते.

त्यामुळे गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी प्लास्टिकच्या भांड्यातील अन्न खाणे किंवा प्लास्टिकच्या भांड्यातील पाणी पिणे टाळावे. दुसऱ्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, प्लास्टिकचे भांडे गरम केल्यास त्यात ठेवलेली कोणतीही वस्तू दूषित होते आणि मायक्रोप्लास्टिक पोटात जाण्याची शक्यता असते.

त्यामुळे गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकशी संपर्क टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अभ्यासात संशोधकांनी स्तनदा मातांना कॉस्मेटिक आणि टूथपेस्टचा वापर टाळण्यास सांगितले. सिंथेटिक कापड देखील टाळण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

'दशावतार'ला गोमंतकीयांची पसंती! CM सावंतांनीही घेतला सिनेमाचा आनंद, म्हणाले,"गोवा आणि कोकणाच्या संस्कृतीत..."

Bicholim: बेपत्ता महिला अखेर बेळगावी येथील आश्रमात सापडली, हातुर्लीतील चंद्रिकाचा आठवडाभरापासून सुरू होता शोध

Supreme Court: काहींना तुरुंगात टाकल्यास धडा मिळेल, काडीकचरा जाळणाऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका

मोपा विमानतळ 'Haunted' म्हणणाऱ्या ब्लॉगरला जामीन; न्यायालयाने पोलिसांनाच फटकारले

SCROLL FOR NEXT