Meta company  Twitter
ग्लोबल

Meta Layoffs: फेसबुकने दिला 11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ

सीईओ मार्क झुकेरबर्गने मागितली माफी; ट्विटरनंतर आता मेटा कंपनीतही कर्मचारी कपात

गोमन्तक डिजिटल टीम

Meta Layoffs: एलन मस्क यांनी ट्विटरची सुत्रे हाती घेतल्यानंतर कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना नुकतेच घरी घालवले आहे. त्यानंतर आता फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटा कंपनीने तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. याबद्दल कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग याबद्दल कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती आणि ताज्या तिमाहितीली कंपनीचे निकाल पाहून तसेच डिजिटल महसुलामध्ये घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स इंक कंपनीने नवीन कर्मचारी भरती आधीच थांबवली आहे. त्यातच आता 11 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. ही संख्या मेटामधील एकुण कर्मचाऱ्यांच्या 13 टक्के आहे.

याबद्दल बोलताना झुकेरबर्ग म्हणाले की, आम्ही या निर्णयाप्रत कसे आलो, याची संपुर्ण जबाबदारी माझी आहे. हा निर्णय सर्वांसाठीच कठिण होता. ज्या लोकांना याचा फटका बसला आहे, त्याबद्दल मला खेद वाटतो.

मेटा कंपनीच्या ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे, त्यांना 4 महिन्यांचा पगार दिला जाणार आहे. कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख लॉरी गोलेर यांनी सांगितले की, नुकसान भरपाई म्हणून कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचा पगार दिला जाणार आहे.

मेटा कंपनीची सुरवात 2004 पासून फेसबुकपासून झाली आहे. कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. दरम्यान, याच वर्षात ट्विटरने त्यांच्या 50 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. स्नॅपचॅटनेही एकुण मनुष्यबळाच्या 20 टक्के कर्मचारी कपात करणार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT