Building
Building Dainik Gomantak
ग्लोबल

Video: चीनच्या चांगशा शहरात बहुमजली इमारतीला भीषण आग, अनेकजण ठार

दैनिक गोमन्तक

China: चीनच्या चांगशा शहरात एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली आहे. चीनच्या सरकारी मीडियाने ही माहिती दिली आहे. मृतांचा आकडा अद्याप कळू शकलेला नाही, असेही सांगण्यात आले आहे. सीसीटीव्हीने सांगितले की, "आगीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात धूर निघत आहे. आगीमुळे अनेक मॉल जळत आहेत." अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली असून मदत आणि बचाव कार्य सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, लोकांची घरे आणि कार्यालये दोन्ही गगनचुंबी इमारतीत असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनच्या (China) सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमची ही इमारत आहे.

दुसरीकडे, सीसीटीव्हीने प्रसिद्ध केलेल्या फोटोमध्ये शहराच्या मध्यभागी असलेल्या इमारतीतून धूर निघत आहे. काळ्या धूराचे लोट व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT