Mass Grave In UK Dainik Gomantak
ग्लोबल

Mass Grave In UK: जुन्या इमारतीखाली सापडले 300 सांगाडे ; ब्रिटनमध्ये खळबळ

गोमन्तक डिजिटल टीम

युनायटेड किंगडममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील पेमब्रोकशायर येथे एका जुन्या इमारतीखाली तब्बल 300 सांगाडे सापडले असून, यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सांगाडे कसे आले हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. दरम्यान, येथील स्थानिक लोकांनी या जागेला महान कबर असे म्हटले आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना कामगारांना हे सांगाडे मिळाले आहेत.

300 सांगाड्यांपैकी निम्मे अवशेष मुलांचे

द सन या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पेमब्रोकशायर येथून ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर, पुरातत्व शास्त्रज्ञ घटनास्थळी पोहोचले आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञांना मिळालेल्या माहिातीनुसार 300 सांगाड्यांपैकी निम्मे अवशेष लहान मुलांचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याठिकाणी प्राचीन स्मशानभूमी असून, ती 600 वर्षांहून अधिक जुनी असावी असे इतिहासकारांचे मत आहे.

पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला वेल्श प्रिन्स ओवेन ग्लिंडरने पेमब्रोकशायर शहरावर आक्रमण केले. त्यानंतर या ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमी बांधण्यात आली असावी असा एक सिद्धांत आहे. मेलऑनलाइनच्या अहवालानुसार, 18 व्या शतकापर्यंत ही जागा दफन करण्यासाठी वापरली जाण्याची शक्यता आहे.

1405 मध्ये ओवेन ग्लिंडरने शहरावर हल्ला केला होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक मारले गेले होते. अशी माहिती साइट पर्यवेक्षक अँड्र्यू शूब्रूक यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT