जगातील अनेक श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांची लपलेली संपत्ती पेंडोरा पेपर्सच्या(Pandora paper scam) माध्यमातून समोर आली आहे. काही प्रकरणांमध्ये मनी लाँडरिंगची नोंदही झाली आहे.आणि या प्रकरणामुळे जगातील अनेक देशाचे सरकार अडचणीत येताना दिसत आहेत. आणि याच प्रकरणाने पाकिस्तानचे (Pakistan) इम्रान सरकार (Imran Khan) ही अडचणीत येताना दिसत आहे.
पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (Pakistan Muslim -league) उपाध्यक्षा मरियम नवाज (Maryam Nawaz) यांनी पांडोरा पेपर्स प्रकरणावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना लक्ष्य केले आहे. इम्रान खान यांच्या भ्रष्ट सरकारला हटवण्यासाठी जनतेचा पाठिंबा मागताना मरियम म्हणाल्या की, ' पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकार नुकत्याच झालेल्या पेंडोरा पेपर लीकमध्ये 'नंबर 1' आहे." जिओ न्यूजच्या अहवालानुसार, फैसलाबादमध्ये एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान इम्रान खान स्वतःला जबाबदारीपासून वाचवू शकत नाहीत. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
पेंडोरा पेपर्स प्रकरणी हल्ला चढवताना ' देशाला सांगण्यात आले की इम्रान खान यांचे नाव यादीत समाविष्ट नाही. तुम्ही कधी ऐकले आहे की चोरांच्या टोळीचा नेता एक प्रामाणिक माणूस होता? इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्सने दोन वर्षांच्या तपासणीनंतर संकलित केलेल्या पेंडोरा पेपर्समध्ये 35 हून अधिक वर्तमान आणि माजी जागतिक नेते तसेच जगभरातील 330 हून अधिक राजकारणी आणि अधिकारी उघडकीस आले, ज्यांनी कथितपणे टॅक्स हेवनचा वापर केला होता. ऑफशोर कंपन्यांमार्फत वास्तविक उत्पन्न लपवले.' असा आरोप त्यांनी केला आहे.
या डोजियरमध्ये 11.9 दशलक्षांहून अधिक गोपनीय दस्तऐवज आहेत. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मरियमने वाढत्या महागाईवर आक्षेप घेतला आणि म्हटले की, एकदा पंतप्रधान इम्रान खान यांनी कसे पीठ महाग झाल्याची टिप्पणी केली होती, हे देशातील शासक "भ्रष्ट" असल्याचे लक्षण आहे.परराष्ट्र धोरणाच्या बाबींविषयी बोलताना मरियम म्हणाल्या की, त्या आघाडीवरही गोष्टी निराशाजनक आहेत, इम्रान खान यांच्या आवाहनाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी "प्रतिसाद देत नाहीत", तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अद्याप पंतप्रधानांना बोलावले देखील नाही. असा खोचक टोला देखील लावला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.