Mark Zuckerberg Facebook Meta  Dainik Gomantak
ग्लोबल

Zuckerberg's Facebook Down: मार्क झकरबर्गच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट; 11 कोटींवरून थेट 9 हजारांवर

मेटाच्या सीईओचेच फेसबूक पेज झाले डाऊन; प्रोफाईल पेजवर एररचा मेसेज

गोमन्तक डिजिटल टीम

Mark Zuckerberg Facebook Page Down: संपुर्ण जगाला फेसबूक देणारा फेसबुकचा संस्थापक आणि सध्या मेटा कंपनीचा सीईओ मार्क झकरबर्ग यांचेच फेसबूक पेज डाऊन झाले आहे. झकरबर्ग यांच्या फेसबूक प्रोफाईवल पेजवर एरर असा मेसेज दिसत असून मार्कच्या फॉलोअर्सच्या संख्येत प्रचंड मोठी घट झाली आहे. मार्कच्या फॉलोअर्सची संख्या 11.9 कोटीवरून थेट 10 हजारांच्याही खाली आली आहे.

दरम्यान, जगभरातील इतरही अनेक फेसबूक युजर्सच्या फॉलोअर्समध्ये अचानक घट झाल्याचे दिसून आले आहे. तशा तक्रारीही युजर्सनी केलेल्या आहेत. एका बगमुळे हे सर्व झाल्याचे सांगितले जात आहे. मार्क झकरबर्गचे पुर्वी 11.9 कोटी (119 मिलियन) फॉलोअर्स होते, पण बुधवारी दुपारी 12 पर्यंत ही संख्या 9 हजार 995 वर आली होती.

अॅपवर झकरबर्गचे प्रोफाईल पेजदेखील दिसत नसून ते ओपन करण्याचा प्रयत्न केल्यास एक मेसेज दिसून येत आहे. या मेसेजमध्ये लिहिलेले आहे की, हे पेज सध्या उपलब्ध नाही. तांत्रिक चुकीमुळे हे झालेले आहे. तथापि, वेबपेजवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या घटल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विशेष म्हणजे, फेसबूक किंवा मार्क झकरबर्गक यांपैकी कुणाकडुनही यावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

11 ऑक्टोबर रोजीच मेटा कंपनीने फेसबूक युजर्सच्या डेटा चोरीचा ईशारा दिला होता. अँड्रॉईड आणि आयओएस अॅप्सवरून लॉगिनची माहिती चोरी करून त्याचा गैरवापर केला जात असल्याचे मेटाने सांगितले होते, तसेच युजर्सनी पासवर्ड बदलावा, असेही म्हटले होते. जवळपास 10 लाख फेसबूक युजर्सचा डाटा चोरी गेल्याचे समोर आले होते. 400 अॅप्सद्वारे लॉगिन चोरी होत असल्याचेही मेटाने सांगितले होते. दरम्यान, मेटा आपल्या विविध व्यासपीठांवरून रशिया-युक्रेन युद्धात रशियाविरोधात अपप्रचार करत असल्यावरून रशियाने फेसबूकला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT