रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. जगभरातील देशांची नाराजी असतानाही रशिया युक्रेनवरील आपला हल्ला थांबवायला तयार नाही. रशियाच्या (Russia) या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र जगातील सर्व देशांव्यतिरिक्त खुद्द रशियातही या हल्ल्याला विरोध होत आहे. पुतीन सरकारच्या विरोधात दररोज शेकडो लोक रस्त्यावर उतरत आहेत. दरम्यान, 4 मार्च रोजी फेसबुकसह अनेक माध्यमांच्या वेबसाइट्स डाउन झाल्याचे सांगण्यात आले आहे. (Many Media Websites Including Facebook In Russia Will Ban)
रशियावर आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
फेसबुकसह इतर मीडिया वेबसाईट डाऊन केल्यानंतर पुतीन सरकारविरोधात रशियन नागरिकांचा संताप आणखीनच वाढला आहे. रशियातील लोक पुतीन आणि त्यांच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर निदर्शने करत आहेत. त्याच वेळी, मीडिया वेबसाइट्स देखील रशियन नागरिकांच्या आंदोलनाला कव्हर करत आहेत. त्यातच आता या डिजिटल मीडिया साइट्स बंद करण्यामागे रशियन सरकारचा हात असल्याचेही सांगितले जात असून अनेक आरोप केले जात आहेत.
याबाबत माहिती देताना एएफपीचे पत्रकार आणि एका मॉनिटर ग्रुपने सांगितले की, ''युक्रेनबाबत रशियन नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. फेसबुकसह इतर माध्यमांच्या वेबसाइटचे डाऊनिंग हे त्याचेच द्योतक आहे. रशियाविरोधात अशी निदर्शने जगभरातील अनेक देशांमध्ये सुरु असली तरी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर युक्रेनवरील या हल्ल्याबाबत अनेक बड्या देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. ज्याचा परिणाम आता रशियाच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे.''
चर्चेच्या दोन्ही फेऱ्या विफल ठरल्या
रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. मात्र आत्तापर्यंत कोणत्याही स्वरुपाचा तोडगा निघालेला नाही. चर्चेनंतर रशिया हल्ले अधिक तीव्र करत असून युक्रेनला आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडत आहे. दुसरीकडे युक्रेनचे म्हणणे आहे की, जेव्हा रशिया युक्रेनमधून आपले सैन्य मागे घेईल तेव्हाच आपण अट मान्य करु. तसेच युक्रेनही हार मानायला तयार नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यावेळी म्हणाले की, 'आम्ही देशाच्या संरक्षणासाठी लढत राहू.' आतापर्यंत 9 हजारांहून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.