Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: भाईचा ऑरॉच खतरनाक! गळ्यातील नोटांच्या लांबलचक माळेने वेधले लक्ष, व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'हा तर अंबानींचा नातेवाईक दिसतोय...'

Funny Video Viral: सध्या अशाच एका अतरंगी व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे, ज्यात एका व्यक्तीने गळ्यात नोटांची लांबलचक माळ (Garland of Notes) घातल्याचे दिसत आहे.

Manish Jadhav

Social Media Viral Video: सोशल मीडियाचे जग खरोखरच अद्भुत आहे. येथे दररोज विविध प्रकारचा कंटेंट पाहायला मिळतो. काही व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असतात, तर काही निव्वळ मनोरंजक असतात. सध्या अशाच एका अतरंगी व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे, ज्यात एका व्यक्तीने गळ्यात नोटांची लांबलचक माळ (Garland of Notes) घातल्याचे दिसत आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

दरम्यान, जो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, त्यात एक व्यक्ती एका उंच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छतावर उभा असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, त्याच्या गळ्यात नोटांची एक मोठी आणि लांबलचक माळ घातलेली आहे. ही माळ छतावरुन खाली रस्त्यापर्यंत येत आहे. गल्लीतील अनेक लोक ही माळ धरुन उभे असल्याचेही या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. ही माळ इतकी लांब आहे की ती संपूर्ण इमारतीला वेढून रस्त्यावर आली आहे.

नोटा खऱ्या की खोट्या?

मात्र, ही नोटांची माळ खरी आहे की नकली याबद्दल सोशल मीडिया (Social Media) यूजर्समध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक यूजर्संनी ही माळ नकली नोटांची असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. कारण, जर ही माळ खऱ्या नोटांची असती, तर लोकं लगेच ती चोरुन घेऊन गेले असते, असे मत अनेकांनी व्यक्त केले. तर काही यूजर्संनी, हा व्हिडिओ केवळ रील बनवण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष वेधण्यासाठी तयार केला असावा, असे म्हटले आहे.

'एक्स'वर @TweetExpress2 नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये गंमतीने लिहिले, 'अंबानीचा नातेवाईक आहे की काय?' व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने "टेन्शन घेऊ नका, त्या नकली नोटा आहेत," असे लिहिले. दुसऱ्या एका युजरने "हे तर गजब आहे," असे म्हटले. या व्हिडिओने सोशल मीडियावर सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून तो बघून लोकं आश्चर्य व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

Goa News Live: लुथरा बंधुंना घेऊन दिल्लीतून निघाले गोवा पोलिस

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

Prithvi Shaw-Sapna Gill: 'विनयभंगाचे आरोप खोटे, माझा अपमान करण्याचा प्रयत्न'; 'पृथ्वी शॉ'नं सपना गिलचे आरोप फेटाळले

ZP Election: गोवा जपण्यासाठी योग्य व्यक्तीला मत द्या! समाज कार्यकर्त्यांची हाक, शहाणपणाने मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT