

Mamta Kulkarni-Dawood Ibrahim Viral News: ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ममता कुलकर्णी आता अध्यात्माच्या मार्गावर आहेत. त्यांनी संन्यास घेऊन महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी ही उपाधी धारण केली आहे.
नुकताच त्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका छठोत्सवानिमित्त आयोजित भजन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भूतकाळाबद्दल आणि वादग्रस्त संबंधांबद्दल मोठे विधान केले, ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांची चर्चा सुरू झाली आहे.
जेव्हा पत्रकारांनी त्यांना दाऊद इब्राहिमबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा ममता कुलकर्णी यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, "माझा दाऊदशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नव्हता, मी त्याला माझ्या आयुष्यात कधी भेटलेच नाही." याचदरम्यान, त्यांनी अप्रत्यक्षपणे विकी गोस्वामी याच्याबद्दल विधान केले, ज्याच्याशी त्यांचे नाव जोडले गेले होते.
त्यांनी सांगितले की, "एका व्यक्तीचे नाव माझ्यासोबत जोडले गेले होते. पण, तुम्ही पाहिलं असेल की त्याने देशात कोणताही बाँबस्फोट किंवा देशविरोधी कृत्य केले नाही. मी त्याच्यासोबत नाही, पण तो दहशतवादी नव्हता." या विधानात त्यांनी विकी गोस्वामीचे नाव घेतले नसले तरी, त्यांच्या बोलण्याचा रोख विकी गोस्वामीकडेच असल्याचे मानले जात आहे.
ममता कुलकर्णी यांचे नाव अंडरवर्ल्डमधील डॉन छोटा राजनचा निकटवर्तीय विकी गोस्वामी याच्याशी जोडले गेले होते. विकी गोस्वामीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप होता आणि याच प्रकरणात ममता कुलकर्णी यांचेही नाव आले होते.
२००० कोटी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा आणि विकीच्या व्यवसायाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचा दावा ममता कुलकर्णी यांनी अनेकदा केला आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, "मी विकी गोस्वामीशी लग्न केलेले नाही आणि मी सिंगल आहे." मायानगरीपासून दूर राहून त्या कुठे होत्या, या प्रश्नावर त्यांनी आपण अध्यात्माच्या मार्गावर असल्याचे सांगितले.
ममता कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर कनकेश्वरी नंद गिरी उर्फ किरण बाबा यांच्या घरी छठ उत्सवानिमित्त आयोजित भजन कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्यासोबत किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी किन्नर देखील होत्या. अभिनयाच्या शिखरावर असताना अचानक संन्यास घेतलेल्या ममता कुलकर्णी यांचे जीवन नेहमीच वाद आणि अध्यात्म यांच्या दुहेरी मार्गावर राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.