fire 
ग्लोबल

होणारी बायको नापास होईल या भितीने पठ्याने शाळाच पेटवली

गोमन्तक डिजिटल टीम

इजिप्त (Egypt) देशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. होणारी बायको तिने दिलेल्या परीक्षेत नापास होण्याची शक्यता असल्याने तिच्या होणाऱ्या पतीने चक्क शाळाच पेटवून दिली. विशेष म्हणजे हा तरूण अवघ्या 21 वर्षांचा आहे. या तरूणाचा काही दिवसांपूर्वी त्या तरूणी सोबत साखरपुडा झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी या तरूणाला अटक केली आहे.

पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेऊन त्याला तुरूंगात डांबण्यात आले आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत. तरूण शाळेला आग लावल्यानंतर त्याठिकाणाहून फरार झाला होता. पोलिसांनी त्याला मेनोफिया प्रांतातून अटक केली. शाळा परिसरात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

या तरूणाला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने असे सांगितले की, त्याची होणारी बायको परीक्षेत नापास झाली तर, तिला आणखी एक वर्ष परीक्षा द्यावी लागेल, त्यामुळे त्यांचे लग्न देखील पुढे ढकलण्यात येईल. म्हणून त्याने शाळेलाच आग लावली. दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ शाळेला लागेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आयोगाचे 'अरेराव' - संपादकीय

Akshaya Yog 2026: यश, कीर्ती अन् अमाप संपत्ती! अक्षय तृतीयेला जुळून आला 'राजयोग'; 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे सुवर्णक्षण

केवळ घटनास्थळी उपस्थिती म्हणजे गुन्हा नव्हे, हायकोर्टाचं निरीक्षण; खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताला मिळाला सशर्त जामीन

भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक दिल्लीत, पक्षाध्‍यक्ष नितीन नबीन यांच्यासह वरिष्‍ठांशी करणार चर्चा; बैठकांबाबत उत्सुकता

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 34 अंशांवर, घामाच्या धारांनी गोवेकर हैराण

SCROLL FOR NEXT