Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: "चल छैया छैय्या" गाण्यावर पठ्ठ्याचा जबरा डान्स; बघण्याऱ्यांच्या नजरा खिळल्या

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलांचा एक गट 'चल छैया छैया...' या बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे.

Manish Jadhav

Viral Video: पाकिस्तानात सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलांचा एक गट 'चल छैया छैया...' या बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. मात्र, डान्स व्हिडिओमध्ये लोकांची नजर फक्त एका व्यक्तीवर खिळली आणि ती व्यक्ती समोरच्या रांगेत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तुम्हालाही त्या व्यक्तीचा डान्स त्याची स्तुती करण्यास भाग पाडेल.

एकाच व्यक्तीमुळे व्हिडिओ व्हायरल झाला

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, खुल्या आकाशाखाली एक स्टेज सजवला आहे. ज्यावर काही मुलं बॉलीवूडमधील 'चल छैया-छैया' या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून लोक त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक करत आहेत. पण त्या सगळ्यांमध्ये समोरच्या रांगेत मधोमध नाचणाऱ्या व्यक्तीने आपल्या नेत्रदीपक डान्सने सर्वांना चकित केले.

दुसरीकडे, हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @weddingsbysalman नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 10 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आणि 13 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला. व्हिडिओवर अनेक कमेंट्सही येत आहेत. अनेकांनी त्या व्यक्तीच्या डान्सचे कौतुक केले. लग्नाच्या या डान्स व्हिडीओबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT