Mohamed Muizzu Dainik Gomantak
ग्लोबल

''मोहम्मद मुइज्जू यांच्या भारताप्रती असलेल्या शत्रुत्वाची किंमत...'', मुलाच्या मृत्यूवरुन मालदीवच्या खासदाराने साधला निशाणा

Mohamed Muizzu: मालदीवमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्याने एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चर्चेत आहे. नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे यासंदर्भात निशाण्यावर आहेत.

Manish Jadhav

Maldives MP Meekail Naseem Targeted President Mohamed Muizzu: मालदीवमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्याने एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चर्चेत आहे. नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे यासंदर्भात निशाण्यावर आहेत. मालदीव सरकारने मुलाला एअर अॅम्ब्युलन्सने राजधानी माले येथील रुग्णालयात नेण्याची परवानगी दिली नाही. याचे कारण हे हेलिकॉप्टर भारताने दिले होते. आता तिथले नेतेही मुइज्जू यांच्यावर निशाणा साधत आहेत. मालदीवच्या एका खासदाराने याप्रकरणी राष्ट्राध्यक्षांच्या भारताशी असलेल्या वैराला जबाबदार धरले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना मालदीवचे खासदार मिकाइल नसीम म्हणाले की, 'राष्ट्राध्यक्षांच्या (मोहम्मद मुइज्जू) भारताप्रती असलेल्या शत्रुत्वासाठी लोकांना आपल्या जीवाची किंमत चुकवावी लागू नये.' हे तेच मिकेल नसीम आहेत, ज्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात मालदीवच्या नेत्यांच्या अपमानास्पद वक्तव्याच्या प्रकरणी जबाबदारी आणि कारवाईवर भर देताना परराष्ट्रमंत्र्यांना संसदेत बोलावण्यास सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या बुधवारी घडली. मुलाला ब्रेन ट्यूमर होता आणि त्याला पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला गाफ अलिफ विलिंगिली येथील त्याच्या घरातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर एम्ब्युलन्सची विनंती केली. तात्काळ वैद्यकीय स्थलांतर करण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

रिपोर्टनुसार, मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले की, 'मी मुलाला झटका आल्यानंतर लगेचच त्याला माले येथे नेण्यासाठी आयलँड एव्हिएशनला कॉल केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. गुरुवारी सकाळी 8.30 वाजता त्यांनी फोनला उत्तर दिले. या प्रकारासाठी एअर एम्ब्युलन्स हा एकमेव उपाय आहे. आणीबाणीच्या एअरलिफ्टची विनंती केल्यानंतर 16 तासांनी मुलाला मालेकडे आणण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT