Terrorist Dainik Gomantak
ग्लोबल

Mali Terrorist Attack: दहशतवादी हल्ल्याने माली हादरले, लष्करी तळ आणि बोटीला केले लक्ष्य; 64 जणांचा मृत्यू

Mali Terrorist Attack: मालीमध्ये लष्करी तळ आणि प्रवासी बोटीवर दोन वेगवेगळ्या संशयित जिहादी हल्ल्यांमध्ये चौसष्ट लोक ठार झाले.

Manish Jadhav

Mali Terrorist Attack: मालीमध्ये लष्करी तळ आणि प्रवासी बोटीवर दोन वेगवेगळ्या संशयित जिहादी हल्ल्यांमध्ये चौसष्ट लोक ठार झाले. या हल्ल्यांमध्ये नायजर नदीवरील टिम्बकटू बोट आणि उत्तर गाओ प्रदेशातील बंबा येथील लष्कराच्या स्थानाला लक्ष्य करण्यात आले, ज्यात 49 नागरिकांचा मृत्यू झाला, असे एएफपी वृत्तसंस्थेने अधिकृत विधानाचा हवाला देत वृत्त दिले. आणि 15 सैनिक ठार झाले. या हल्ल्यात किती लोक मारले गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अल-कायदाशी संबंधित एका गटाने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्याचे एएफपीच्या वृत्तात म्हटले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, बोटीवर 1100 GMT च्या सुमारास हल्ला करण्यात आला.

बोटीवर तीन रॉकेटने हल्ला केला

मिळालेल्या माहितीनुसार, बोटीचे ऑपरेटर कोमानव यांनी सांगितले की, जहाज नदीकाठी असलेल्या शहरांमधील स्थापित मार्गावरुन निघाले होते, याचदरम्यान हल्ला करण्यात आला. एएफपीच्या मते, सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये नायजर नदीवर काळ्या धुराचे ढग उठताना दिसत आहेत. दुसरीकडे, अल-कायदा-संबंधित सपोर्ट ग्रुप फॉर इस्लाम अँड मुस्लिम (जीएसआयएम) ने ऑगस्टमध्ये घोषित केले होते की, ते उत्तर मालीमधील ऐतिहासिक क्रॉसरोड शहर टिम्बकटूला ब्लॉक करत आहेत.

जंटाच्या दहशतवादी गटांवर हवाई हल्ले

याआधी बुधवारी, जंटाने सांगितले की, त्यांनी देशाच्या उत्तरेकडील हल्ल्यांची योजना आखत असलेल्या दहशतवादी गटांवर हवाई हल्ले केले. X वर एक पोस्ट शेअर करताना लष्कराने म्हटले की, 'प्रतिबंधात्मक FAMA (मालियन सशस्त्र दल) हवाई हल्ल्यांनंतर एक हवाई कारवाई करण्यात आली, ज्यात सशस्त्र दहशतवादी गटांना लक्ष्य केले गेले ज्यात एक वाँटेड दहशतवादी म्होरक्या होता.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT