Pakistani Professor Ishtiaq Ahmed: पाकिस्तानचे स्वातंत्र्य आणि महात्मा गांधींबाबत पाकिस्तानी वंशाच्या एका प्राध्यापकाचे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये ते पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना, महात्मा गांधी आणि भारत सरकारचे आभार मानायला हवे, ज्यांनी पाकिस्तानला (Pakistan) विनाशापासून वाचवले, असे म्हणताना ऐकू येत आहेत. ते म्हणाले की, 'महात्मा गांधींनी प्राण देऊन पाकिस्तानला वाचवले.'
पाकिस्तानी वंशाचे स्वीडिश प्रोफेसर इश्तियाक अहमद यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'फाळणीच्या वेळी सर्व मुस्लिम भारतात आले असते तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता. नेहरु आणि महात्मा गांधी यांचे आभार आहे ज्यांनी पाकिस्तानला उभे राहण्यास मदत केली.'
अहमद पुढे म्हणाले की, 'मोहम्मद अली जिना यांची इच्छा नव्हती की भारतातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरीताचा लोंढा यावा. 35 दशलक्ष लोक भारतातून (India) येऊ शकले असते, ज्याप्रमाणे आम्ही एकाही हिंदू-शीखला पश्चिम पाकिस्तानात राहू दिले नाही.'
ते पुढे म्हणाले की, ''35 दशलक्ष लोक भारतातून आले असते, ज्यातील 50 लाख बिहारमधून आले असते, त्यांनी पूर्व पाकिस्तानात वस्ती केली असती. अशा परिस्थितीत पूर्व पाकिस्तान त्या वेळी खूप गरीब होता. 1947 मध्ये पश्चिम पाकिस्तानची लोकसंख्या आधीच 33.9 दशलक्ष होती, जर हे 30 दशलक्ष इथे आले असते तर ती वाढून सुमारे 64 दशलक्ष झाली असती.''
प्रोफेसर इश्तियाक अहमद पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानच्या निर्मितीनंतर इथे लिहिण्यासाठी पेपरही नव्हता. अशा स्थितीत पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता, मात्र महात्मा गांधींनी प्राण देऊन पाकिस्तान वाचवला. जवाहरलाल नेहरुंनीही यात मदत केली. म्हणूनच जिनासाहेबांना पाकिस्तानसाठी इतकं काही करता आलं त्याबद्दल भारत सरकारचं ऋणी असायला हवं.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.