China Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

China Earthquake: चीनमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 6.8 तीव्रतेची नोंद

चीनमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणावले असुन 6.6 तीव्रता होती.

दैनिक गोमन्तक

चीनच्या सिचुआन प्रांताच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात आज म्हणजेच सोमवारी 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. अशी माहिती चीनच्या AFP ने USGS (United States Geological Survey) नेटवर्क केंद्राने दिली आहे.

सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या आग्नेयेला सुमारे 43 किलोमीटर (26 मैल) 10 किलोमीटर खोलीवर भूकंप झाला, असे यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने म्हटले आहे. सिचुआनची राजधानी चेंगडूच्या नैऋत्येस सुमारे 180 किमी (111 मैल) अंतरावर याचे धक्के जाणवले आहेत. केंद्राने सांगितले की, भूकंपाचे केंद्र लुडिंग शहरात 16 किलोमीटर खोलीवर होते. चांगशा आणि शियानसारख्या दूरच्या नेटिझन्सनी सांगितले की त्यांना सिचुआनमधील भूकंपाचे धक्के जाणवले.

काही मिनिटांनंतर, केंद्रानुसार लुडिंगजवळील यान शहराला 4.2 तीव्रतेचा दुसरा भूकंप बसला. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 2013 मध्ये, यानला जोरदार भूकंपाचा धक्का बसला, 100 हून अधिक लोक ठार झाले आणि हजारो जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT