lockdown Dainik Gomantak
ग्लोबल

Lockdown in China : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

Lockdown in China : हाँगकाँगमध्ये 87 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू

दैनिक गोमन्तक

Lockdown in China : जगाच्या पाठीवर दोन देशांच्यामध्ये भयानक युद्ध पेटलं असल्याने कोरोना कडे कोणाचे लक्ष नाही. पण चीनमधील कोरोनाच्या बातमीमुळे अनेकांच्या मनात पुन्हा धडकी भरली असून अनेकांनी पुन्हा लॉकडाऊन होणार की काय असे प्रश्न पडले आहेत. (lock down in china's tech hub Shenzhen)

जगभरात (World Corona Update) कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून गेल्या 24 तासांत जगात 13 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3579 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या चीनमध्ये 3100 रुग्णांची नोंद झाली आहे. जी गेल्या 2 वर्षांतील सर्वाधीक असून खबरदारी म्हणून चीनच्या शेनजेनमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरातील तब्बल 1,70,00,000 नागरिकांना घरामध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच शांघाईमधील (Shanghai) शाळा ही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान चीनच्या शेनजेनमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर चीनच्या (China) जिलीन प्रांताची राजधानी चांगचुनमध्येही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शेडोंगमधील युचेंगला ही लॉकडाऊनचे (lockdown) आदेश देण्यात आले होते. तर सध्या चीनच्या तीन शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला असून तीन्ही शहरातील नागरिकांना अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हांगकांग शहरात 87 नागरिकांचा मृत्यू

चीनमधील शेनझेन शहर हे हाँगकाँगला लागून आहे. हाँगकाँगमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त असून येथे 27,647 कोरोनाबाधित आहेत. तर 87 नागरिकांचा कोरोनाने (Corona) मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या 3,729 झाली आहे. तर चीनमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या 24 तासांत 13 लाखांहून अधिक रुग्णांची (Patients) नोंद जगभरात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT