Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

...स्वीडन करणार नाटो सदस्यत्वासाठी अर्ज, रशियाला मिळालं आव्हान

फिनलंडप्रमाणेच स्वीडनही नाटो सदस्यत्वासाठी अर्ज करणार असल्याने रशियाच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

स्वीडनने फिनलंडप्रमाणे नाटो सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी हे एक मोठं आव्हान मानलं जात आहे. स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांनी सोमवारी जाहीर केले की, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्वीडन फिनलँडप्रमाणेच नाटोच्या सदस्यत्वाची विनंती करेल. हा ऐतिहासिक बदल या नॉर्डिक देशात 200 वर्षांहून अधिक वर्षांच्या लष्करी अलाइनमेंटनंतर आला आहे. मात्र, यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात जवळपास तीन महिन्यांपासून लष्करी संघर्ष सुरु आहे. रशियन सैन्याने राजधानी कीवमधून सैन्य मागे घेतले आहे, परंतु डॉनबास प्रदेशात लष्करी कारवाई अधिक केली आहे. दुसरीकडे, असे मानले जात आहे की, रशियाला युक्रेनचं अस्तित्व सागरी सीमेवरुन पूर्णपणे संपवायचं आहे.

दुसरीकडे, स्वीडन (Sweden) आणि फिनलंड रशियाचे सीमावर्ती देश आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या कारवाईनंतर त्यांच्यावर दबाव वाढला आहे. फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांनी आधीच सांगितले आहे की, 'आमचा देश नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) मध्ये सामील होण्यास समर्थन देतो.' मात्र, या दोन देशांना नाटोचे सदस्यत्व मिळण्यात तुर्कस्तान मोठा अडथळा ठरु शकतो. नाटो सदस्यत्वासाठी या देशांच्या भूमिकेचे समर्थन करत नसल्याचे तुर्कीचे अध्यक्ष तय्यप एर्दोगन यांनी म्हटले आहे. NATO सदस्यत्वासाठी नव्या देशांना सर्व विद्यमान सदस्य राष्ट्रांचे समर्थन आवश्यक आहे. तुर्कीने व्हेटो केल्यास हे प्रकरण अडचणीत येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT