Lashkar-E-Taiba Terrorist Killed In Kasur Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

कोण होता लष्कर-ए-तैयबाचा Jihadi Guru अब्दुल्ला शाहीन? पाकिस्तानात केले ढेर

Lashkar-E-Taiba Terrorist Killed In Kasur Pakistan: दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाला आणखी एक मोठा झटका बसला आहे.

Manish Jadhav

Lashkar-E-Taiba Terrorist Killed In Kasur Pakistan: दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. संघटनेचा रिक्रूटर ट्रेनर अब्दुल्ला शाहीन याचा पाकिस्तानमधील कसूर येथे मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अब्दुल्ला शाहीनला लष्कर-ए-तैयबाचा जिहादी गुरु म्हणून संबोधले जात होते. अनेक दिवसांपासून पाकिस्तानात लपलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी कोणत्या ना कोणत्या कारणांनी मारले जात आहेत. आता त्या यादीत अब्दुल्ला याचेही नाव जोडले गेले आहे.

पाकिस्तानात टार्गेट किलिंग सुरु आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून टार्गेट किलिंग सुरु आहे. अज्ञात लोकांकडून दहशतवादी मारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांत 20 हून अधिक हायप्रोफाईल दहशतवादी मारले गेले आहेत. 18 डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील टँक जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाचा 'ए' दर्जाचा दहशतवादी हबीबुल्ला उर्फ ​​भोला खान याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. तो लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदचा जवळचा नातेवाईक होता. नवीन दहशतवाद्यांची भरती करणे हे त्याचे काम होते. यापूर्वी, टँक जिल्ह्यातच हाजी उमर गुल आणि त्याच्या दोन साथीदारांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. गुलचे काम संस्थेसाठी पैसे गोळा करण्याचे होते.

गेल्या काही महिन्यांत दहशतवादी मारले गेले

पाकिस्तानातील कराचीमध्ये दहशतवादी हंजला अदनानची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

मलिक अस्लम वजीर खैबर पख्तुनख्वा येथे स्फोटात मारला गेला. वजीरासोबत त्याचा मुलगा आणि आणखी एक व्यक्ती मारली गेली.

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा जवळचा मौलाना रहीम तारिक उल्ला याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

हाफिज सईदचा जवळचा अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याची पाकिस्तानातील बाजापूरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

मुझफ्फराबादच्या अथमुकम तहसीलमध्ये ख्वाज शाहिद ऊर्फ मियाँ मुजाहिदची हत्या

भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी'चा दहशतवादी मोहम्मद सलीमची हत्या

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ आणि आयएसआय एजंट मुल्ला बहौर उर्फ ​​होर्मुझ याची हत्या

दाऊद मलिक, बशीर अहमद पीर उर्फ ​​इम्तियाज, अबू कासिम, परमजीत सिंग पंजवाड, जहूर मिस्त्री, खालिद रझा आणि अब्दुल सलाम भट्टवी हे देखील पाकिस्तानात मारले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT