Lashkar-e-Taiba chief terrorist Qaisar Farooq shot dead in Karachi. Dainik Gomantak
ग्लोबल

Video: लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख दहशतवादी कैसर फारूकची कराचीत गोळ्या घालून हत्या

Lashkar-e-Taiba: गेल्या काही दिवसांपासून हाफीज सईदचा मुलगा बेपत्ता झाला आहे आणि आयएसआय त्याला शोधण्यात अपयश येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशात दहशतवादी कैसर फारूकची कराचीमध्ये हत्या करण्यात आली आहे.

Ashutosh Masgaunde

Lashkar-e-Taiba chief terrorist Qaisar Farooq shot dead in Karachi:

पाकिस्तानातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा आणखी एका मोठा शत्रू असलेल्या दहशतवाद्याची पाकिस्तानमधील कराचीमध्ये अज्ञात लोकांनी हत्या केली आहे. मुफ्ती कैसर फारुख असे हत्या झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. मुफ्ती कैसर फारुख कुठेतरी जात असताना अज्ञातांनी त्याची हत्या केली.

मुफ्ती कैसर फारुख हा भारतविरोधी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक होता आणि प्रमुख हाफिज सईदच्या जवळचा होता. मुफ्ती कैसर फारुख याची हत्या हाफिज सईदसाठी मोठा धक्का ठरणार हे नक्की.

भारताचा वॉन्टेड दहशतवादी

मुफ्ती कैसर फारुख याच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये काही लोक रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. पांढरा कुर्ता आणि पायजमा घातलेला मुफ्ती कैसर फारूकही मागे दिसत आहे.

यावेळी काही अज्ञात लोक कैसर फारुखवर अचानक गोळ्या झाडू लागतात. कैसर फारुखने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. हल्लेखोरांच्या गोळ्या लागल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत रस्त्यावरून चालणारे सर्व लोक गोळीबार होताना पाहून जीव वाचवण्यासाठी धावू लागले होते.

मुफ्ती कैसर फारुख हा भारताचा वॉन्टेड दहशतवादी होता. तो पाकिस्तानात राहत असल्याने त्याला आतापर्यंत पकडता आले नव्हते.

हाफीज सईदचा मुलगा बेपत्ता

गेल्या काही दिवसांपासून हाफीज सईदचा मुलगा बेपत्ता झाला आहे आणि आयएसआय त्याला शोधण्यात अपयश येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशात दहशतवादी कैसर फारूकची कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी आणि व्हिडिओ समोर आला आहे.

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदचा एक मुलगा कमालुद्दीन सईद मंगळवारपासून (26 सप्टेंबर) बेपत्ता आहे. कमलुद्दीन सईदचे पेशावरमध्ये कारमधून आलेल्यांनी अपहरण केल्याची माहिती आहे.

हाफिज सईद हा पाकिस्तानी नागरिक आहे आणि मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. तो पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा दहशतवादी आहे.

पाकिस्तानी पोलीस अपयशी

याआधीही पाकिस्तानमध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या अनेक बड्या दहशतवाद्यांना अज्ञातांकडून ठार करण्यात आले आहे. लष्कराच्या झिया-उर-रहमानची अलीकडेच काही लोकांनी हत्या केली होती.

अल बद्रचा खालिद रझा याचीही काही दिवसांपूर्वी हल्लेखोरांनी हत्या केली होती. यापैकी एकाही घटनेत सहभागी असलेल्या हल्लेखोरांना पकडण्यातही पाकिस्तानी पोलिसांना यश आलेले नाही.

यापूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी मारल्या गेलेल्या अनेक बड्या दहशतवाद्यांनाही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने सुरक्षा दिली होती.

आतापर्यंत 17 दहशतवाद्यांची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या

गेल्या काही वर्षांत भारतासह जगभरात दहशतवादी कारवाया करणाऱ्या अनेक दहशतवादांची हत्या करण्यात आल्या आहेत. मात्र यांच्या हत्येमागे असलेले हल्लेखोर अद्यापही सापडलेले नाहीत. आतापर्यंत अज्ञात हल्लेखोरांद्वारे हत्या करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या 17 वर पोहचली आहे.

  • जहूर मिस्त्री - IC-814 अपहरणकर्ता (कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या)

  • रिपुदमन सिंग मलिक 1985 एअर इंडिया बॉम्बस्फोट (सरेमध्ये गोळ्या घालून हत्या)

  • मोहम्मद लाल - ISI ऑपरेटर (19 सप्टेंबर 2022 रोजी नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या)

  • हरविंदर सिंग संधू - 2021 पंजाब पोलिस मुख्यालयावर आरपीजी हल्ला (लाहोरमधील रुग्णालयात ड्रग ओव्हरडोजमुळे मृत्यू)

  • बशीर अहमद पीर- एचएम कमांडर (रावळपिंडीत गोळ्या घालून हत्या)

  • सय्यद खालिद रझा - अल बद्र कमांडर (कराचीत ठार)

  • इम्तियाज आलम - (रावळपिंडीत मारला गेलेला हिजबुल कमांडर)

  • एजाज अहमद अहंगर - (ISJK, अफगाणिस्तानात गोळ्या घालून हत्या)

  • सय्यद नूर शालोबर - (बारा खैबर, पाकिस्तानमध्ये गोळ्या घालून हत्या)

  • परमजीत सिंग पंजवार - KCF प्रमुख (6 मे 2023 रोजी लाहोरमध्ये गोळ्या घालून हत्या)

  • अवतार सिंग खांडा - (16 जून 2023 रोजी बर्मिंगहॅम, यूके येथे संशयास्पद विषबाधामुळे मृत्यू )

  • हरदीप सिंग निज्जर - (19 जून 2023 रोजी ब्रिटिश कोलंबिया, कॅनडातील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून ठार)

  • सरदार हुसेन अरैन - (1 ऑगस्ट 2023 रोजी सिंधमधील नवाबशाह येथे गोळ्या झाडून हत्या)

  • रियाझ उर्फ अबू कासिम काश्मिरी सो मुहम्मद आझम (एलईटी कमांडरची 8 सप्टेंबर 2023 रोजी PoJK मधील रावळकोट मशिदीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली)

  • सुखदूल सिंग उर्फ सुखा दुनेके, (20 सप्टेंबर 2023 रोजी विनिपेग, कॅनडात गोळ्या घालून हत्या )

  • झियाउर रहमान (सप्टेंबर 2023 मध्ये कराचीमध्ये हिजुबुल मुजाहिदीनच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या)

  • मुफ्ती कैसर फारुक (LeT संस्थापक सदस्य, सोहराब गोथ, कराची, पाकिस्तान येथे 30 सप्टेंबर रोजी गोळ्या घालून हत्या)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT