Landslide After Torrential Rains On Sumatra Island Of Indonesia Dainik Gomantak
ग्लोबल

Indonesia: इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर मुसळधार पावसानंतर भूस्खलन; 19 जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

Landslide After Torrential Rains On Sumatra: इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर मुसळधार पावसामुळे अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Manish Jadhav

Landslide After Torrential Rains On Sumatra Island Of Indonesia: इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर मुसळधार पावसामुळे अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भूस्खलन आणि पुरामुळे 19 जणांचा मृत्यू झाला, तर सात जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांची संख्या आणखी वाढू शकते. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी घटनास्थळी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. अनेकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

कितीतरी टन माती, खडक आणि उन्मळून पडलेली झाडे शुक्रवारी रात्री उशिरा नदीत आली, असे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख डॉनी युस्रीझल यांनी सांगितले. त्यानंतर पश्चिम सुमात्रा प्रांतातील पेसिसिर सेलाटन जिल्ह्यातील डोंगराळ गावांमध्ये पूराचे पाणी आले, त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. युसरी वॉटरने दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीतील मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे.

80 हजारांहून अधिक लोक विस्थापित

अचानक आलेल्या पुरात दोन गावकरी जखमी झाले आणि बचाव कर्मचारी अद्याप बेपत्ता असलेल्या सात लोकांचा शोध घेत आहेत, असे एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे. पूर आणि भूस्खलनामुळे 14 घरे जमीनदोस्त झाली तर 80,000 हून अधिक लोकांना तात्पुरत्या सरकारी आश्रयस्थानात पाठवले गेले. पश्चिम सुमात्रा प्रांतातील नऊ जिल्हे आणि शहरांमधील सुमारे 20,000 घरांचे नुकसान झाले, असेही निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT