जगभरात कोरोनाचं (Covid 19) सावट घोंघावत असताना आता अमेरिकेतील (America) टेक्सासमध्ये (Texas) 'मंकीपॉक्स' या व्हायरसचा (Monkeypox Virus) रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आगोदर 2003 मध्ये अमेरिकेत रुग्ण आढळून आला असल्याची माहिती रोग नियंत्रक आणि प्रतिबंधक संस्थेने दिली आहे. मंकीपॉक्सपिडित रुग्णाला डल्लास (Dallas) येथील रुग्णालयामध्ये (Hospital) दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाने नायजेरियामनधून (Nigeria) प्रवास केला असल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. या प्रकरणाची वैद्यकीय यंत्रणा तपासणी करत आहेत.
तसेच या रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तिंना मंकीपॉक्सचे संक्रमण झाले असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. हा रुग्ण ज्या विमानाने अमेरिकेत आला, त्या विमानातील प्रवाशांची माहिती घेण्यात येत आहे. या मंकीपॉक्सबाधित रुग्णाने दोन विमाने बदलत अमेरिकेमध्ये प्रवेश केला होता. नायजेरियातील लागोसमधून 8 जुलैला अटलॅंटमध्ये आणि 9 जुलै अटलॅंटमधून डल्लासमध्ये प्रवेश केला होता. सध्यातरी या नव्या संसर्गाबद्दल कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
काय आहेत मंकीपॉक्सची लक्षणे
मंकीपॉक्स झालेल्या प्राण्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर या संसर्गाची लागण होते. मात्र याबाबत अजूनही वैद्यनिकांमध्ये स्पष्टता नाही. या संसर्गाची लागण 6 ते 13 दिवसामध्ये होते. काही लोकांना 5 ते 21 दिवसातही या संसर्गाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीला ताप, डोकेदुखी, मांसपेशीमध्ये दुखापत, आणि पाठदुखीचा त्रास उद्भवतो. त्याचबरोबर थकवाही जाणवतो. तसेच आजारी व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि अंगावर फोडही येतात. काही रुग्णांच्या डोळ्यांवरही प्रभाव जाणवतो. मंकीपॉक्समुळे मृत्यूचं प्रमाण हे 11 टक्क्यांपर्यंत असू शकते. तर लहान बालकांना या संसर्गाचा सर्वाधिक मृत्यूचा धोका आहे.
मंकीपॉक्सवर इलाज
आतापर्यंत मंकीपॉक्सवर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत, अशी माहीती जागतिक आरोग्य संघटननेनं दिली आहे. लसीमुळे मंकीपॉक्सला रोखण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. यावर अजूनही संशोध न सुरु आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता असणे जास्त महत्त्वाचे बनले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.