Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: 'झेलेन्स्कीचे शिर घेऊन या...', पुतिन यांनी वॅगनर ग्रुपला दिला खतरनाक टास्क!

Vladimir putin: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी क्रेमलिनमध्ये वॅगनरच्या प्रमुखाशी गुप्त चर्चा केली, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Manish Jadhav

Vladimir Putin: रशिया-युक्रेन यांच्याच सुरु असेलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. यातच, रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी क्रेमलिनमध्ये वॅगनरच्या प्रमुखाशी गुप्त चर्चा केली, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

वॅगनर ग्रुपने गेल्या महिन्यात पुतिन यांच्याविरोधात सशस्त्र बंड केले होते. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रेंच प्रकाशन लिबरेशननुसार, येवगेनी प्रिगोझिन आणि त्यांच्या वॅगनर सैन्याच्या उठावाच्या एका आठवड्यानंतर, 1 जुलै रोजी ही बैठक झाली.

दरम्यान, कथित बैठकीपासून प्रिगोझिन शेजारच्या बेलारुसमध्ये राहण्याऐवजी रशियामध्ये राहत असल्याचे दिसते. पुतिन आणि प्रिगोझिन यांच्यातील संघर्षानंतर, आता असे म्हटले जाते की, प्रिगोझिन यांना एक नवीन टास्क देण्यात आले आहे - 'युक्रेनियन अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची हत्या करणे आणि त्यांचे डोके क्रेमलिनमध्ये आणणे'. डेली मेलने ही बातमी दिली आहे.

दुसरीकडे, संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना पदच्युत करण्याच्या उद्देशाने केलेल्या सशस्त्र बंडानंतर पुतिन राजवटीत परत जाण्यासाठी, प्रिगोझिन काही मोठा कट घड़वून आणतील, असे नोबेल पारितोषिक विजेते दिमित्री मुराटोव्ह यांनी म्हटले आहे.

तसेच, नोवाया गॅझेट चालवणारे मुराटोव्ह यांनी झिव्हॉय ग्वोझ्ड यांना त्यांच्या YouTube शोमध्ये सांगितले की, "मला वाटते प्रिगोझिन पुतीन यांची माफी मागू शकत नाही." मुराटोव्ह म्हणाले की, "परंतु ते रशियाच्या फायद्यासाठी काही मोठा कट रचू शकतात. ते युक्रेनचे (Ukraine) अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची हत्या करण्याचा प्रयत्न करु शकतात.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT