Hardeep Nijjar Shot Dead Dainik Gomantak
ग्लोबल

Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar: तगड्या प्लॅनिंगने हरदीपसिंग निज्जरची हत्या, व्हिडिओ पहिल्यांदाच आला समोर; खलिस्तानी दहशतीत

Khalistani Terrorist Hardeep Singh: सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ दूरवर असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीबीएस न्यूजने हा व्हिडिओ 'द फिफ्थ इस्टेट' मधून मिळवला आहे.

Manish Jadhav

Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar Death: कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर तब्बल नऊ महिन्यांनी या घटनेचे कथित व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ दूरवर असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीबीएस न्यूजने हा व्हिडिओ 'द फिफ्थ इस्टेट' मधून मिळवला आहे. 'द फिफ्थ इस्टेट' ही कॅनेडियन इन्वेस्टिगेटिव डॉक्यूमेंट्री सीरीज आहे. ही सीरीज फक्त CBS नेटवर्कवर प्रसारित होते.

सीबीएस न्यूजच्या रिपोर्टनुसार, फुटेजची एकाहून अधिक स्त्रोतांकडून पडताळणी करण्यात आली आहे. खलिस्तानी फुटीरतावादी निज्जरची गेल्या वर्षी जूनमध्ये कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर हत्या करण्यात आली होती. या हत्येवरुन भारत आणि कॅनडा यांच्यात राजनैतिक वाद निर्माण झाला. कॅनडाने भारतावर आरोप केला की, त्यांच्या एजंटनी निज्जरची हत्या केली. मात्र, भारताने हे आरोप ठामपणे फेटाळून लावले. भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते.

दरम्यान, आता निज्जर याच्या हत्येचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, निज्जर त्याच्या राखाडी रंगाच्या डॉज राम पिकअपमधून गुरुद्वाराच्या पार्किंगमधून बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. पार्किंगच्या शेजारील लेनमध्ये एक पांढरी सेडान कारही त्याच्यासोबत जाताना दिसते. तो बाहेर पडताना जवळ येताच निज्जरच्या समोर एक पांढऱ्या रंगाची कार येऊन त्याची गाडीला थांबवते. त्यानंतर, दोन अज्ञात व्यक्ती त्याच्या दिशेने धावतात आणि निज्जरला गोळ्या घालून घटनास्थळावरुन पळून जातात, सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार. हल्लेखोर टोयोटा कॅमरीमधून पळून जाताना दिसत आहेत.

दुसरीकडे, निज्जर याच्या हत्येशी संबंधित कोणताही व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर खलिस्तानवाद्यांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी, अमेरिकेने आणखी एका खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या कथित हत्येच्या कटात भारतीय एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. यूएस सरकारच्या वकिलांनी दाखल केलेल्या खटल्यात दावा केला होता की, ज्या व्यक्तीला पन्नूची हत्या करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते, त्याला निज्जरच्या हत्येचा व्हिडिओ दाखवण्यात आला होता.

गेल्या वर्षी, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. मात्र, भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. भारताने असेही म्हटले आहे की, निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंट सामील असल्याचा दावा करण्यासाठी कॅनडाने कधीही कोणतेही पुरावे दिले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT