Khalistani Terrorist Gurupatwant Singh Pannu Dainik Gomantak
ग्लोबल

Gurupatwant Singh Pannu: गुरुपतवंत सिंग पन्नू प्रकरणात कोर्ट सख्त; अमेरिकन सरकारकडे मागितले पुरावे

New York Court: अमेरिकन जिल्हा दंडाधिकारी व्हिक्टर मॅरेरो यांनी सरकारला तीन दिवसांत सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

Manish Jadhav

Khalistani Terrorist Gurupatwant Singh Pannu: खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी न्यूयॉर्कच्या कोर्टाने अमेरिकन सरकारकडे जाब विचारला आहे. अमेरिकन जिल्हा दंडाधिकारी व्हिक्टर मॅरेरो यांनी सरकारला तीन दिवसांत सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

गुप्ता याच्यावर पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे

दरम्यान, याचिकाकर्ते निखिल गुप्ता याच्या याचिकेवर न्यूयॉर्क कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. निखिल गुप्ता सध्या अमेरिकन तुरुंगात आहे. गुप्ता याच्यावर पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याच्यावर भारत सरकारच्या अधिकाऱ्यासोबत कट रचल्याचा आरोप आहे. मात्र, हा सरकारी अधिकारी कोण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. अमेरिकन पोलिस या सरकारी अधिकाऱ्याचा शोध घेत आहेत.

सरकारने या प्रकरणात हत्येच्या कटाशी संबंधित पुरावे सादर करावेत

दुसरीकडे, या सुनावणीदरम्यान न्यूयॉर्क कोर्टाने निखिल गुप्ताच्या याचिकेवर अमेरिकन सरकारला या प्रकरणात हत्येच्या कटाशी संबंधित पुरावे सादर करण्यास सांगितले. त्याचवेळी, सरकारी वकिलाने कोर्टात सांगितले की, निखिल गुप्ता पन्नूच्या हत्येचा कट रचत होता. गुप्ताने पैशाच्या बदल्यात ही हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप वकिलाचा होता.

याचिकाकर्ता कायद्याचे पालन करणारे भारतीय नागरिक

सुनावणीदरम्यान, गुप्ताच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, याचिकाकर्ता हा इंडियन लॉ फॉलो करणारा भारतीय नागरिक आहे. त्याला या कटात गोवले जात आहे. या सर्व आरोपांमध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचे गुप्ता म्हणाला होता.

निखिल 30 जूनपासून तुरुंगात आहे

निखिल गुप्ता हा भारतीय नागरिक आहे. 30 जून 2023 रोजी आरोप झाल्यानंतर त्याला चेक रिपब्लिक पोलिसांनी अटक केली. त्यानंतर अमेरिकन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तेव्हापासून तो अमेरिकेच्या ताब्यात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: ‘पेपरलीक’चा तपासणी अहवाल माध्यमांकडे गेला कसा? ‘विद्यापीठ टिचर्स’ने उघडले तोंड; चौकशीची केली मागणी

Bhausaheb Bandodkar: ..भाऊसाहेबांना फक्त 10 वर्षेच मिळाली, पण त्यांनी गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली; पुण्यतिथी विशेष

Goa Politics: खरी कुजबुज; म्हावळिंगेत जागेचे गौडबंगाल

Van Maulinge: '..आमचा गाव आम्हाला हवा’! वन-म्‍हावळिंगेत लोकांचा रुद्रावतार; घरांचे सर्वेक्षण रोखले, अधिकाऱ्यांना पाठवले माघारी

Bogus Voter List: सांताक्रुझमध्ये 3000, सुरावलीमध्ये 100 बोगस मतदार; काँग्रेसकडून पुरावे सादर; छोट्या घरात 26 नावे असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT