Khalistan  Dainik Gomantak
ग्लोबल

Khalistan Toolkit Disclosure: खलिस्तानी टूलकिटवर मोठा खुलासा, ISI ने लाहोरपासून कॅनडापर्यंत केली होती 'ही' तयारी

Manish Jadhav

ISI Toolkit For Khalistan: खलिस्तानच्या मदतीने शेजारी देश (पाकिस्तान) आपल्या नापाक हेतूंना खतपाणी घालत आहे. कॅनडातील खलिस्तान्यांना पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानने एक टूलकिट तयार केले आहे, ज्याद्वारे जागतिक स्तरावर भारताला बदनाम करण्याचा हेतू आहे.

एकीकडे भारत खलिस्तानविरुद्ध निर्णायक लढाई लढत असताना, दुसरीकडे पाकिस्तान आपल्या नापाक हेतूने खलिस्तानला मदत करत आहे.

आधीपासूनच पाकिस्तान भारताविरुद्ध कट रचत आला आहे. पाकिस्तान खलिस्तानी विचारसरणीला सतत खतपाणी घालत आहे, जेणेकरुन भारत त्यात अडकून राहू शकेल आणि सीमेवर आपले दहशतवादी मनसुबे यशस्वी करु शकेल.

ISI ची मोठी रणनिती

कॅनडात (Canada) खलिस्तानी कट यशस्वी करण्यासाठी पाकिस्तानने आयएसआयच्या मदतीने एक टूलकिट तयार केले आहे. या टूलकिटच्या माध्यमातून खलिस्तानच्या नावाने कॅनडात सुरु असलेली निदर्शने यशस्वी करण्यासाठी आयएसआयने मोठी रणनिती आखली आहे.

पाकिस्तानची तयारी काय आहे?

गुप्तचर यंत्रणांनुसार, पाकिस्तानच्या (Pakistan) लाहोर, कराची आणि इस्लामाबादमधून भारताविरोधात दुष्प्रचार केला जात आहे. भारताविरुद्धच्या खलिस्तानी कटाशी संबंधित शेकडो सोशल मीडिया खाती गुप्तचर संस्थांनी ओळखली आहेत. गेल्या काही दिवसांपासून खलिस्तानच्या समर्थनार्थ हॅशटॅग तयार करुन ते सोशल मीडियावर ट्रेंड करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

ISI ने टूलकिट तयार केले?

आयएसआयने खलिस्तानी टूलकिट तयार केली आहेत. या टूलकिटच्या सहाय्याने कॅनडातील भारतविरोधी मोहिमेला आणखी बळ मिळू शकेल. आयएसआय यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांची मदत घेत आहे.

सोशल मीडियावर भारताविरोधात प्रक्षोभक मेसेज व्हायरल केले जात आहेत. जागतिक स्तरावर भारताचा निषेध करण्याचा डाव आहे. लाहोर, कराची आणि इस्लामाबादमधून भारताविरुद्ध दुष्प्रचाराची तयारी सुरु आहे.

भारताविरुद्धच्या खलिस्तानी षडयंत्राशी निगडीत सोशल मीडिया अकाउंट्सची ओळख पटवली जात आहे. #HardeepSinghNijjar, #KhalistanfreedomRally, #KhalistanReferendum आणि #Khalistan सारखे हॅशटॅग ट्रेंड करण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. आयएसआयने तयार केलेल्या टूलकिटमध्ये खलिस्तानींशी संबंधित अनेक भडकाऊ लेखही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

काय आहे आयएसआयची योजना?

आयएसआयने तयार केलेल्या टूलकिटमध्ये खलिस्तानींशी संबंधित अनेक भडकाऊ लेख सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

पाकिस्तानी लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांशिवाय, आयएसआय पत्रकारांची आणि सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेल्या पाकिस्तानींची मदत घेत आहे.

अशा सर्व लोकांना आयएसआयकडून खलिस्तानच्या नावाने भारताविरुद्ध भडकाऊ पोस्ट्स दिल्या जात आहेत. याशिवाय, अशा पोस्टमध्ये कोणते हॅशटॅग वापरायचे हे देखील त्यांना सांगितले जात आहे, जेणेकरुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले जाऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT