Kerala’s Sreeju won 45 Crore lottery in UAE Twitter/ @hemant_smile
ग्लोबल

UAE Lottery: केरळचा श्रीजू UAE मध्ये झाला 'करोडपती'; लॉटरीत जिंकले तब्बल एवढे कोटी

Kerala’s Sreeju won 45 Crore lottery in UAE: लाखो भारतीय मध्य पूर्व देशांमध्ये राहतात. त्यांच्यापैकी बरेच जण मोठ्या लॉटरी आणि जॅकपॉटसाठी नशीब आजमावतात.

Manish Jadhav

Kerala’s Sreeju won 45 Crore lottery in UAE: लाखो भारतीय मध्य पूर्व देशांमध्ये राहतात. त्यांच्यापैकी बरेच जण मोठ्या लॉटरी आणि जॅकपॉटसाठी नशीब आजमावतात. अशा परिस्थितीत येथील तेल-गॅस कंपनीत काम करणाऱ्या 39 वर्षीय केरळच्या श्रीजूने लॉटरीमध्ये नशीब आजमावले.

बुधवारी लॉटरी उघडली तेव्हा श्रीजूलाही आश्चर्याचा धक्का बसला. या लॉटरीतून त्याने तब्बल 45 कोटी रुपये जिंकले. श्रीजूने बुधवारी झालेल्या महाजूझ सॅटरडे मिलियन्स ड्रॉमध्ये ही लॉटरी जिंकली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीजू गेल्या 11 वर्षांपासून यूएईमध्ये राहत आहे. त्याने अजून घरही बांधले नव्हते. गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत श्रीजूने सांगितले की, 'जेव्हा मी माझे अकाऊंट तपासले तेव्हा मला आश्चर्य वाटले. मात्र, याची पुष्टी करण्यासाठी मी महजूजच्या कॉलची वाट पाहत होतो.' श्रीजूच्या आधीही अनेक भारतीयांनी UAE मध्ये मोठ्या लॉटरी जिंकल्या आहेत. गेल्या शनिवारी यूएईमध्येच केरळच्या सरथ शिवदासनने 11 लाख रुपये जिंकले होते.

अनेक भारतीयांनी लॉटरी जिंकली आहे

दरम्यान, याच ड्रॉमध्ये मुंबईच्या (Mumbai) मनोज भावसारलाही 16 लाखांची लॉटरी लागली होती. तो अबुधाबीमध्ये 16 वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स रिपेयरिंगचे काम करत आहे. लॉटरी जिंकल्याबद्दल भावसार म्हणाला होता की, 'जेव्हा मला अभिनंदनाचा मेल आला तेव्हा मला खूप आनंद झाला. यानंतर मी माझ्या आईला फोन करुन लाईव्ह ड्रॉ स्ट्रीम पाहण्यास सांगितले. यानंतर माझे नाव पाहताच ती आनंदाने उडी मारली.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT