Kenya Plane Crash Dainik Gomantak
ग्लोबल

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

Kenya Plane Crash: आफ्रिकेतील देश केनियामध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली. केनियाच्या किनारी प्रदेश असलेल्या क्वाले (Kwale) भागात हा अपघात झाला.

Manish Jadhav

Kenya Plane Crash: आफ्रिकेतील देश केनियामध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली. केनियाच्या किनारी प्रदेश असलेल्या क्वाले (Kwale) भागात हा अपघात झाला. या अपघातात विमानातून प्रवास करत असलेल्या 12 जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान मासाई मारा राष्ट्रीय राखीव क्षेत्र (Masai Mara National Reserve) या लोकप्रिय पर्यटन स्थळाकडे जात असताना ही भीषण दुर्घटना घडली. मासाई मारा हे एक प्रसिद्ध ठिकाण असून येथे टांझानियाच्या (Tanzania) सेरेनगेटीमधून दरवर्षी मोठ्या संख्येने वन्यजीव स्थलांतर करतात.

डोंगराळ भागात अपघात

क्वाले प्रांताचे आयुक्त स्टीफन ओरिंडे यांनी 'एसोसिएटेड प्रेस'ला दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात डायनी हवाई पट्टीपासून (Diani Airstrip) सुमारे 40 किलोमीटर दूर असलेल्या एका डोंगराळ आणि जंगली भागात झाला. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ शोध आणि बचाव कार्य (Search and Rescue Operation) सुरु करण्यात आले. ओरिंडे यांनी सांगितले की, बचाव कार्य सध्या अपघातस्थळी सुरु आहे आणि यासंबंधीची अधिक माहिती लवकरच दिली जाईल.

दुसरीकडे, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की त्यांनी एक मोठा स्फोटाचा आवाज ऐकला आणि घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना मानवी अवशेष आढळले. या अपघातात (Accident) कोणीही जिवंत सापडले नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

केनिया नागरी उड्डाण प्राधिकरणाने (KCAA) पुष्टी केली की विमानात 12 लोक होते आणि अधिकारी दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करत आहेत. मोम्बासा एअर सफारी (Mombasa Air Safari) या एअरलाइनने सांगितले की, ते नागरी उड्डाण प्राधिकरणास (KCAA) पूर्ण सहकार्य करत आहेत आणि अपघाताशी संबंधित माहिती प्राधिकरणाद्वारे दिली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND v AUS Head To Head Record: टी-20 चा खरा किंग कोण? भारत-ऑस्ट्रेलिया महासंग्राम बुधवारपासून! काय सांगतो हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Goa Ration Shop: गोव्यातील रेशन दुकानदारांसाठी खूशखबर! 1 कोटींचे थकीत कमिशन मिळणार; केंद्राकडून निधी मंजूर

41,663 रुपये दारुवर उडवले, बाकी गोवा ट्रीपचा खर्च फक्त 32 हजार; तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ Watch

20 दिवसांत टक्कल होणार गायब! वैज्ञानिकांनी बनवले केस उगवणारे चमत्कारी औषध; जाणून घ्या कसे करते काम

India vs South Africa: 5 सामन्यांत 2 शतके, 1 द्विशतक...! श्रेयस अय्यरची जागा घेणार विराटचा पठ्ठ्या? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पाडणार छाप

SCROLL FOR NEXT