Ken Tanaka Dainik Gomantak
ग्लोबल

जगातील सर्वात वयोवृध्द आज्जीने घेतला अखेरचा निरोप

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जपानच्या केन तनाका (Ken Tanaka) यांचे वयाच्या 119 व्या वर्षी निधन झाले.

दैनिक गोमन्तक

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जपानच्या केन तनाका यांचे वयाच्या 119 व्या वर्षी निधन झाले. 19 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. जपान सरकारने सोमवारी ही माहिती दिली. त्यांच्या मृत्यूनंतर आता फ्रान्सच्या (France) लुसिल रेंडन (Sister Andre) जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनल्या आहेत. त्यांचे वय 118 वर्षे 73 दिवस आहे. केन यांचा जन्म 2 जानेवारी 1903 रोजी नैऋत्य जपानच्या (Japan) फुकुओका भागात झाला होता. त्याच वर्षी, राइट बंधूंनी प्रथमच त्यांच्या स्वत: च्या विमानातून उड्डाण केले होते. त्याचबरोबर मेरी क्युरी नोबेल पारितोषिक मिळविणारी पहिली महिला ठरल्या होत्या. (Ken Tanaka of Japan dies at 119)

बोर्डमध्ये गेम खेळला

तनाका नर्सिंग होममध्ये राहत असत. तिथे त्या रिव्हर्सी हा बोर्ड गेम खेळत. तरुणपणी त्यांनी अनेक व्यवसाय केले. यामध्ये नूडलचे दुकान आणि तांदूळ केकचे दुकान यांचाही समावेश आहे. मार्च 2019 मध्ये वयाच्या 116 व्या वर्षी त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळखले होते. सप्टेंबर 2020 मध्ये, जपानने त्यांना 117 वर्षे 261 दिवस वयाच्या जपानमधील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून मान्यता दिली.

वयाच्या 19 व्या वर्षी लग्न केले

तनाका, नऊ भावंडांपैकी सातव्या, वयाच्या 19 व्या वर्षी हिदेओ तनाकाशी 1922 मध्ये लग्न झाले होते. त्यांना चार मुले आहेत, पाचवा मुलगा त्यांनी दत्तक घेतला आहे.

दीर्घायुष्याचे रहस्य

सोडा आणि चॉकलेटसह स्वादिष्ट अन्न खाणे आणि नवीन गोष्टी शिकणे हेच आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे तानाका यांनी सांगितले होते. कॅलिग्राफी आणि अंकशास्त्र या विषयांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना प्रचंड रस होता.

फ्रान्सची ल्युसिल रेंडॉन (Sister Andre) आता सर्वात वृद्ध

आता फ्रान्सच्या ल्युसिल रेंडन (Sister Andre) जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनल्या आहेत. त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये झाला. त्या टुलॉन येथील नर्सिंग होममध्ये राहतात. त्यांचा दिवस प्रार्थनेने सुरु होतो. त्यानंतर त्या नाश्ता करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT