Kelly Jacobs fell in love  Dainik Gomantak
ग्लोबल

Kelly Jacobs: 2032 मध्ये तुरूंगातून सुटणाऱ्या कैद्याच्या प्रेमात पडली केली

केली जेकब्स (Kelly Jacobs) एका रॉंग नंबरच्या प्रेमात पडली.

दैनिक गोमन्तक

प्रेमात माणूस आंधळा होतो हे पुन्हा सिद्ध झालं आहे. प्रेमात माणसाला काहीही दिसत नाही तो जगभान विसरून वावरत असतो. जे लोकं प्रेमात पडतात ते वेडे होतात असं म्हटल जात. तंत्रज्ञानाच युग आलं तेव्हापासून तर या नात्यात लॉंग डिस्टंन्सने पण फरक पडत नाही. अशीच एक लव्ह स्टोरी सध्या चर्चेत आहे. नेदरलैंड ची (Netherlands) 28 वर्षीय केली जेकब्स (Kelly Jacobs) एका रॉंग नंबरच्या प्रेमात पडली. यानंतर जेव्हा तिला हे समजले की ज्याच्या प्रेमात ती पडली आहे तो अमेरिकेच्या तुरूंगात खुन केल्या प्रकरणी शिक्षा भोगत आहे, हे सगळ जाणून देखिल तिने त्याच्याशी आपले प्रेम संबंध कायम ठेवले. आणि आता ती तिच्या मारेकरी प्रियकराच्या सुटकेची वाट पहात आहे, जेणेकरुन तो बाहेर आल्यावर दोघे लग्न करू शकतील. (Kelly Jacobs fell in love with a prisoner who was released from a U.S. prison in 2032)

हा कैदी 2032 मध्ये तुरूंगातून सुटणार

या महिलेच्या लग्नाच्या घोषणेने सोशल मिडियावर चांगलिच खळबळ उडविली आहे. तिने सांगितले की, ती अशा व्यक्तीशी लग्न करणार आहे जो एक खुनी कैदी आहे.ज्याची तीने कधीही भेट घेतली नाही. चार खुन केल्याप्रकरणी तो शिक्षा भोगत असलेला हा कैदी 2032 मध्ये तुरूंगातून सुटणार आहे. तोपर्यंत केली त्याची वाट पाहणार आहे. केली नेदरलँड्समध्ये सोशल वर्क ग्रॅज्युएट आहे आणि अमेरिकेच्या ओरेगॉन जेलमध्ये असलेल्या जेम्स व्याट डेंटलच्या ती प्रेमात पडली आहे. व्याट 2019 पासून तुरूंगात आहे. त्याच्यावर चार जणांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. पण तुरुंगात असतांनाही व्याट 5000 मैल दूर राहणाऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडला.

रॉंग नंबरमुळे पडला प्रेमात

केलीने तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले की, दोघांत पहिले संभाषण जेलच्या फोनवरूनच झाले होते. हा एक रॉंग नंबर होता. जो योग्य ठिकाणी कनेक्ट झाला. व्याटशी बोलताना केली त्याच्या प्रेमात पडली. यानंतर दोघांनीही व्हिडीओ कॉलवर आपले प्रेम व्यक्त केले आणि आता लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत. केलीने सांगितले की तिचे प्रेम आणखी दृढ होण्यासाठी तिने तिच्या बोटावर व्याटच्या नावाचा ट्याटू देकिल काढला आहे.

व्याटला वाटतेय भीती

आपल्या प्रियकराच्या बाजूने बोलतांना केली म्हणाली की, त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला वाचविण्यासाठी चार जणांवर गोळ्या झाडल्या होत्या मात्र त्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. पण व्याटला तुरुंगात जावं लागलं. या प्रसंगानंतर त्याची मैत्रीणही त्याला सोडून गेली. व्याटला भीती वाटत आहे की जर ते दोघे इतके लांब राहिले तर त्याचे संबंध टिकणार नाहीत. बाहेरील कोणालातरी केली आवडेल. पण केलीला तिच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. ती व्याटची आतुरतेने वाट पाहत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT