Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Video: विकृतीचा कळस! मुलींच्या व्हॅनचा पाठलाग करणाऱ्या बाईकस्वाराचे अश्लील कृत्य

Karachi: विद्यार्थिनींच्या व्हॅनचा पाठलाग करताना दुचाकीस्वार हस्तमैथुन करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Manish Jadhav

Karachi University Viral Video: पाकिस्तानच्या कराची येथून सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक दुचाकीस्वार मोटरसायकल चालवताना हस्तमैथुन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

विद्यार्थिनींच्या व्हॅनचा पाठलाग करताना दुचाकीस्वार हस्तमैथुन करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हॅनमध्ये बसलेल्या एका विद्यार्थिनीने हा व्हिडीओ शूट केला, ज्यामध्ये एक विकृत व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असताना दिसत आहे.

विकृत तरुण विद्यार्थिनींच्या व्हॅनचा पाठलाग करत होता

कराची विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या (Student) व्हॅनचा पाठलाग करत असताना ही घटना घडली. दुचाकीवरवरुन व्हॅनचा पाठलाग करत असताना त्या व्यक्तीने रशीद मिन्हास रोडवर मुलींसमोर चालत्या दुचाकीवर हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.

या विकृत व्यक्तीने मुलींसमोर हस्तमैथुन केले आणि ज्या भागात ही घटना घडली तो परिसर गजबजलेला असल्याचे सांगितले जाते. यादरम्यान व्हॅनमधील एका मुलीने त्या व्यक्तीचे विकृत कृत्य कॅमेऱ्यात कैद केले.

दुचाकीस्वार हस्तमैथुन करत होता

व्हॅनचा पाठलाग करत असताना दुचाकीवर हस्तमैथुन करताना दिसणारा दुचाकीस्वार हेल्मेट घातलेला दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, त्यानंतर तो व्हायरल झाला.

लोक व्हिडिओ शेअर करत होते आणि अशा विकृतांवर कारवाई करण्यात असमर्थतेबद्दल त्या व्यक्तीवर आणि पोलिसांवर टीका करत होते. दुसरीकडे, पोलिसांनी (Police) या घटनेची दखल घेतली असून त्या व्यक्तीवर कारवाई करत असल्याचे वृत्त आहे.

अपघात झाला असता

व्हिडिओमध्ये हस्तमैथुन करताना दिसणार्‍या व्यक्तीने दुचाकीवरुन व्हॅनचा पाठलाग करताना हे लज्जास्पद कृत्य केले आणि रस्त्यावरुन जाणाऱ्यांचा जीवही धोक्यात टाकला. तो हस्तमैथुन करत व्हॅनमधील मुलींकडे बघत होता आणि दुचाकी सुसाट वेगाने जात होती.

दुचाकीस्वार रस्त्याकडे बघत नसल्यामुळे आणि भरधाव दुचाकीवर हस्तमैथुन करण्यात व्यस्त असल्याने त्याचा अपघात झाला असता. दुसरीकडे, अशा घटना टाळण्यासाठी अशा विकृतांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: '..तर मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार नाही'! कोहलीच्या विधानाने चाहत्यांना धक्का; तुफानी फटकेबाजीबद्दल म्हणाला की..

CM Pramod Sawant: ‘कशे आसात दोतोर?’ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साखळीत गर्दी; आरोग्याची केली विचारपूस

Ponda By Election: फोंड्यात राजकीय ‘पारा’ वाढू लागला! भाजप-काँग्रेस आक्रमक; लैंगिक शोषण प्रकरणाचाही मुद्दा

Indigo Flights: गोव्‍यातून इंडिगोची 6 शहरांची विमानसेवा स्‍थगित! गोमंतकीयांना फटका बसण्‍याची शक्‍यता; 'हे' कारण आले समोर

Ponda By Election: फोंड्यात मुख्यमंत्र्यांसह पाटकर मैदानात! भाजपचा डोळा परप्रांतीय मतांवर; स्मार्ट सिटी बनविण्याची ग्वाही

SCROLL FOR NEXT