कराची: तब्बल १८ वर्षांच्या खंडानंतर बांगलादेशी कलाकारांनी पाकिस्तानमध्ये पाऊल ठेवले आहे. कराचीत सुरू असलेल्या जागतिक सांस्कृतिक महोत्सवातील त्यांच्या सहभागामुळे दोन्ही देशांतील सांस्कृतिक देवाणघेवाणीला नवे पर्व सुरू झाले आहे.
कराची कला परिषदेच्या या कार्यक्रमात काही हिंदू कलाकारांसह बांगलादेशी कलाकार सहभागी सहभागी झाले आहेत. यापैकी गायिका शिरीन जवाद यांनी रात्री रंगतदार सादरीकरण केले. बांगलादेश आर्ट वीकच्या संस्थापक आणि बांगलादेशी प्रतिनिधीमंडळाच्या प्रमुख निहारिका मुमताज यांनी सांगितले की, कराची कला परिषदेकडून मिळालेले हे आमंत्रण आमच्यासाठी मोठी संधी आहे.
जवळपास १८ वर्षांनंतर आमच्या कलाकारांना पाकिस्तानमध्ये त्यांची सांस्कृतिक विविधता सादर करण्याची संधी मिळते आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. दोन्ही देशांतील राजनैतिक आणि राजकीय तणावामुळे गेल्या दशकभराहून अधिक काळ बांगलादेशी कलाकारांच्या पाकिस्तानभेटीवर बंदी होती.
विशेषतः २०१० मध्ये शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारने १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धातील पाकिस्तानी सैन्याला मदत करणाऱ्यांविरुद्ध खटले सुरू केल्यानंतर संबंध तणावपूर्ण झाले होते. हसीना सरकार कोसळल्यापासून बांगलादेशातील हंगामी सरकारची पाकशी जवळीक वाढू लागली आहे.
बांगलादेशी प्रतिनिधीमंडळात शिरीन जावेद, सुबोर्ना मोर्शेदा, फारिया चौधरी, शंभू आचार्य आणि बबली बर्णा यांचा समावेश असून ते संगीत, नृत्य आणि दृश्यकला या तिन्ही विभागांत सादरीकरण करत आहेत. ३० ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा महोत्सव ७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.एकूण १४० देशांतील कलाकार या महोत्सवात सहभागी झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.